गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:36+5:302021-06-05T04:28:36+5:30
ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील रुग्णालयातील एक आरोग्यसेविका म्हणाली, रेल्वे प्रवासात अनेक तरुणी दरवाजात उभ्या राहून प्रवास करतात. त्यामुळे कळव्यासारखी ...

गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते
ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील रुग्णालयातील एक आरोग्यसेविका म्हणाली, रेल्वे प्रवासात अनेक तरुणी दरवाजात उभ्या राहून प्रवास करतात. त्यामुळे कळव्यासारखी घटना घडण्याची भीती असते. अनेकदा फेरीवालेही डब्यात शिरतात. मुळात, महिलांच्या डब्यात पुरुष फेरीवाल्या विक्रेत्यांना परवानगी देणे चुकीचे आहे. अनेकदा गर्दीमध्ये ते धक्काबुक्कीही करतात. रात्रीचा तसा वाईट अनुभव नाही. आरपीएफ पोलीस दिवसा नसतात. दोन्ही शिफ्टमध्ये महिला डब्यात पोलिसांना नियुक्ती देणे गरजेचे असल्याचे ही महिला कर्मचारी म्हणाली.
.............................
सध्या मुंबईत लॉकडाऊनमुळे उपनगरी रेल्वेत प्रवाशांची तुरळक गर्दी असते. त्यामुळे भुरट्या चोरांची दहशत निर्माण झाली आहे. कळवा स्थानकात एका महिलेचा मोबाइल एक जण खेचून पळ काढत होता. यात या महिलेला प्राण गमवावा लागला. एकंदरीतच महिलांना प्रवास करताना असुरक्षित असल्याचे जाणवते आहे. कमीत कमी महिलांच्या डब्यात प्रवासादरम्यान आणि रेल्वेस्थानकावर महिलांच्या डब्यासमोर पोलीस कर्मचारी असल्यास सराईत आणि भुरट्या चोरांना दहशत बसू शकेल. यातूनच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे वैशाली पावडे या अन्य एका प्रवासी महिलेने सांगितले.