शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

गैरव्यवहार झाकण्यासाठी पालिका मुख्यालयास आग लावण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 00:14 IST

स्फोटक फायलींचा साठा; संरक्षण देण्याची भाजपची मागणी

ठाणे : काही वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागून अनेक फायलींची राख झाली होती. मुंबईतील जीएसटी भवनलाही नुकतेच संशयास्पद आगीने वेढले. आता ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातही अनेक स्फोटक गैरव्यवहारांच्या फायलींचा साठा असल्याचा गौप्यस्फोट करून संबंधितांकडून शहर विकास विभागास आग लावण्याची भीती भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. यामुळे हे संकट टाळण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.महापालिकेच्या शहर विकास विभागाने गेल्या काही वर्षांत हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यात बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, ओसी आणि टीडीआर दिाल्याची अनेक कागदपत्रे आहेत. यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत अनेक तक्रारीही सरकारदरबारी दाखल आहेत. तर, काहींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीही सुरू आहे. काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही दाखल आहेत. या सर्व फायलींचा ‘स्फोटक’ साठा सध्या शहर विकास विभागात आहे, याकडे पवार यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.अधिकाऱ्यांतील दुफळी ठरू शकते कारणठाणे महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पात डीजी ठाणेचा गवगवा केला जातो. मात्र, शहर विकास विभागातील सर्व व्यवहार डिजिटल केलेले नाहीत. सर्व व्यवहार कागदी फायलींवरच आहे.मात्र, कधी काळी वादग्रस्त प्रकरणातील फाइल उघडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तीनतेरा वाजू शकतील. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाºयांमधील वाद व दुफळी व्हॉट्सअ‍ॅप चर्चेच्या निमित्ताने उघड झाली.या पार्श्वभूमीवर व बदलती प्रशासकीय स्थिती लक्षात घेऊन शहर विकास विभागाला आग लागल्याची भीती वाटते. तीपासून संरक्षण होण्यासाठी विभागातील इलेक्ट्रिक व्यवस्था, अग्निशामक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मुख्यालय इमारत ठरू शकते पापाची धनीमहापालिका मुख्यालयाच्या इमारतीला ३३ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ठाणेकरांच्या दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास ही इमारतच पापाची धनी ठरू नये. महापालिकेत नगरसेवक म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे.केवळ माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पत्र लिहून शहर विकास विभागाचे संरक्षण करण्याची विनंती केली असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी या पत्राद्वारे प्रशासनाला लगावला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका