उल्हासनगरात उघडयावर शौच करणाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: October 25, 2023 18:11 IST2023-10-25T18:10:10+5:302023-10-25T18:11:10+5:30
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

उल्हासनगरात उघडयावर शौच करणाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथील मोकळ्या जागेवर शौच करण्यासाठी गेलेल्या मयूर सकट व मनोज पवार यांच्यावर दोन इसमाने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मनोज पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथे राहणारे मयूर सकट व मनोज पवार हे दोघे मित्र सोमवारी रात्री दिड वाजता सार्वजनिक शौचालय परिसरातील मोकळ्या जागेत शौच करण्यासाठी बसले. त्यावेळी दोन तरुण त्याठिकाणी येऊन त्यांनी अज्ञात कारणावरून दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने मनोज पवार यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने, तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यात जखमी झालेले मनोज व मयूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अज्ञात दोघांवर भांदवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अज्ञात दोघांचा शोध घेत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.