शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:24 IST

 न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.

ठाणे, दि. 6 - आपल्यावरील बलात्काराचा आरोप खोटा असून त्याच संदर्भातील डीएनए अहवालही निगेटिव्ह आला आहे. तरीही न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.न्यायालय आणि पोलीस यंत्रणेविरोधात ठाणे कारागृहातच या कैद्याने 2 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्याआधी 30 आणि 31 आॅगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचा इशारा त्याने दिला होता. तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता, त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच आरोपाखाली त्याला अटक झाल्यानंतर त्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. मात्र, आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करून त्याने आपल्याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कारागृहातील अधिकाºयांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.ज्या काळात हा प्रकार घडला आहे, त्या वेळी माझे पती त्या शाळेत नव्हे, तर अन्य शाळेला नोकरीला होते, असा दावा या कैद्याची शिक्षिका पत्नी अंजली शुक्ला हिने केला आहे. ‘‘उपोषणाला बसलेले असल्यामुळे तो केवळ पाणी ग्रहण करत आहे. नियमानुसार त्याला नातेवाइकांची मुलाखत आणि न्यायालयाच्या सुनावणीसाठी बाहेर काढण्यास बंदी आहे. त्याच्या उपोषणाची ठाणे न्यायालय आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाही माहिती दिली असून त्याची कारागृहाच्या डॉक्टरांकडून तपासणीही करण्यात येत आहे.’’नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे‘‘लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर संबंधित पीडित मुलीच्या गर्भाची आणि माझ्या पतीची डीएनए चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आहे. त्यामुळे आता यात नार्को किंवा कोणत्याही चाचणीला आम्ही तयार आहोत. गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या माझ्या पतीची तसेच मुलांनाही भेट दिली जात नाही. हे माणुसकीला धरून नाही. परंतु, पतीला न्याय मिळाला नाही, तर मीदेखील उपोषणाला बसेल.’’अंजली शुक्ला (उपोषणकर्त्या कैद्याची पत्नी), नवी मुंबई