पेंढरकरमधील उपोषण ४२ दिवसांनी संपुष्टात
By Admin | Updated: March 27, 2017 05:41 IST2017-03-27T05:41:29+5:302017-03-27T05:41:29+5:30
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभाराविरोधात राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सुरू

पेंढरकरमधील उपोषण ४२ दिवसांनी संपुष्टात
डोंबिवली : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभाराविरोधात राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सुरू केलेले साखळी उपोषण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनानंतर रविवारी, ४२ व्या दिवशी संपुष्टात आले. तावडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून प्रशासक नेमण्याची कारवाई करावी, असे पनवेल येथील सहसंचालक रमा भोसले यांना दिले आहेत. महाविद्यालयाचे अनुदान थांबविण्याचे आदेश देताना सध्या अस्तित्वात असलेल्या मंडळांची माहितीही घेतली.
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाची सिस्टर निवोदिता मराठी माध्यमांची शाळा बंद करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात पालक एकवटले आहेत. या पालकांना व्यवस्थापनाने जवळच असलेल्या टिळकनगर शाळेत प्रवेश घ्या, असे सुचवले आहे. आम्ही किती वेळा डोनेशन भरायचे, असा सवाल पालक वर्ग करीत आहे. या शाळेतील पालकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी २७ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यालयात बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)