गाव दारूमुक्त करण्यासाठी उपोषण
By Admin | Updated: December 23, 2016 03:01 IST2016-12-23T03:01:30+5:302016-12-23T03:01:30+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बोगस कागदपत्रे सादर करून मिळवलेले बीअर शॉप तत्काळ बंद करून सासणे गाव येत्या

गाव दारूमुक्त करण्यासाठी उपोषण
मुरबाड : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बोगस कागदपत्रे सादर करून मिळवलेले बीअर शॉप तत्काळ बंद करून सासणे गाव येत्या ३१ डिसेंबरला दारूमुक्त करावे, या मागणीसाठी सासणे येथील ग्रामस्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यातील सासणे गावात २० ते २५ वर्षे दारूबंदी होती. शिवाय, गावात कोणालाही बीअर शॉप किंवा बीअर बारची परवानगी देण्यात येणार नाही, असा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामपंचायतीने घेतला होता. असे असताना जानेवारी २०१६ मध्ये अचानक गावात बीअर शॉप सुरू झाल्याने विद्यमान सरपंच रेखा अशोक खरे यांनी या बीअर शॉपला आधीच्या ग्रामपंचायत कमिटीने परवानगी दिली आहे काय, असा सवाल केला. (वार्ताहर)