शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 06:43 IST

पदपथावर बसवले : मूलभूत सुविधा देण्याचेही सौजन्य नाही, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हुसकावून लावले

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेकडून शेतकरी आठवडाबाजारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी मीनाताई ठाकरे मंडईतून पालिकेने हुसकावून लावत लक्ष्मी पार्क भागात चक्क पदपथावर शेतकऱ्यांना बसवले. पण, शेतकऱ्यांना पदपथावर बसवल्यानंतर महिना झाला, तरी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची व्यवस्थाच पालिकेने केलेली नाही. पालिका आणि लोकप्रतिनिधींमार्फत शेतकऱ्यांच्या चालवलेल्या या छळाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रामदेव पार्क येथील मंडईच्या आरक्षणात पालिकेने मंडईसह दुकाने काढली असून वरच्या दोन मजल्यांवर चक्क सभागृह बांधले आहे. हे सभागृह कंत्राटदारास भाड्याने देण्याआड पालिकेने खालील दुकाने व मंडईतील गाळेही कंत्राटदारास आंदण दिल्याचा तसेच सभागृह भाड्याने देण्यात कंत्राटदार मनमानी लूट करत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. दररविवारी मंडई-सभागृहाच्या आवारात अर्ध्या दिवसासाठी सरकारी योजनेनुसार भरणारा शेतकरी आठवडाबाजारही पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला.शेतकऱ्यांना हुसकावून लावत पदपथावरच बसवण्याचे प्रकार पालिकेने केले. शेतकरी बाजार येथेच ठेवावा, म्हणून परिसरातील रहिवाशांनी पत्रे दिली. भाजप सोडून अन्य पक्षांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी निवेदने दिली. तरीही, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी कंत्राटदारासाठी शेतकरी बाजार कायमचा बंद करायला लावला. ठाकरे मंडईत त्यांचा जम बसला होता.

मात्र, मंडईतील बाजार बंद पाडून शेतकऱ्यांना कनकियाच्या लक्ष्मी पार्कजवळील पदपथावर आठवडाबाजारासाठी जागा देण्यात आली.पण, त्याला महिना झाला तरीही पालिकेने या शेतकºयांना स्वच्छतागृहासह साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करून दिली नाही. शनिवारी सायंकाळी नाशिकहून भाजीपाला घेऊन निघायचे. रविवारी मध्यरात्री वा पहाटे आल्यावर पदपथावर सकाळ होण्याची वाट पाहायची. सकाळी उठल्यावर अंघोळ, प्रातर्विधीसाठी कुठलीही सोय नाही. दुपारपर्यंत रस्त्याशेजारील पदपथावर धूळ व ऊन खात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे असे अमानवीय हाल पालिकेकडून सुरू आहे. पण, येथे हाल सहन करायचे, वर ग्राहकही नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पालिकेच्या अमानवीय छळ आणि अत्याचाराला कंटाळून रविवार बाजारात यायचेच बंद करून टाकले आहे. सध्या केवळ दोनच शेतकरी येथे येत असल्याचे कालच्या रविवारवरून दिसून आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक