Farmers await compensation of 90 crores | शेतकरी २९ कोटींच्या भरपाईच्या प्रतीक्षेत, राष्ट्रपती राजवटीमुळे संताप
शेतकरी २९ कोटींच्या भरपाईच्या प्रतीक्षेत, राष्ट्रपती राजवटीमुळे संताप

सुरेश लोखंडे
ठाणे : अवेळी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतामधील पीक कुजून नष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाच्या २८ कोटी ८४ लाख ९९ हजार रुपयांची नुकसानभरपाई वेळेत मिळण्याची अपेक्षा आहे. ते अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
राष्टÑपती राजवट आणि काळजीवाहू सरकार या प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत जिल्ह्यातील ७७ हजार नुकसानग्रस्त शेतकरी आहेत. मात्र, सत्ता स्थापनेस कमी पडलेले सर्वच राजकीय पक्ष आता शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती दाखवत आहेत. भविष्यातील सहकार्याच्या अपेक्षेने ते सध्या शेतकºयांची मनधरणी करत असल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. अवकाळी पावसामुळे उभ्या मालासह कापून पडलेल्या पिकांचे नुकसान झाले. त्याच्या नुकसानीच्या ४२ हजार ४२६ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करून कृषी विभागाने शासनास पाठवून दिले. सहा हजार ८०० रुपये हेक्टरी नुकसानभरपाई अहवाल जुन्या अध्यादेशानुसार शासनास देण्यात आलेला आहे. २० ते २४ हजार हेक्टरी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देणारे पक्ष भविष्यातील सहकार्याच्या अपेक्षेने आता केवळ सहानुभूतीसाठी शेतकºयांची भेट घेत आहेत.
जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले. तर, नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे. यामुळे ७७ हजार १२८ शेतकºयांचे २८ कोटी ८४ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या नुकसानीचा शेवटचा अहवाल कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने शासनास दिला आहे. त्यांच्या या नुकसानभरपाईच्या रकमेविषयी सध्या कोणाकडूनही सविस्तर बोलले जात नसल्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.
नुकसानीला बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक भिवंडी तालुक्यातील १९ हजार ४५० शेतकºयांचा समावेश आहे. त्यांच्या १५ हजार ६८० हेक्टरवरील पिकामुळे त्यांचे १० कोटी ६६ लाख २४ हजार रुपयांच्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे आहे. भिवंडी तालुक्याच्या खालोखाल शहापूर तालुक्यातील ११ हजार ७७६.६७ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक २४ हजार १९० शेतकºयांचे आठ कोटींचे नुकसान झाले. यामध्ये ११ हजार ६१२.६७ हेक्टर भातपिकासह नागलीचे १२७ हेक्टर अािण वरीचे ३७ हेक्टर नुकसान शहापूर तालुक्यात झाले आहे. याशिवाय, मुरबाड तालुक्यातील १८ हजार ७२६ शेतकºयांचे सहा कोटी ९६ लाख ९३ हजार रुपयांचे नुकसान झाले. यात १० हजार २४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा समावेश आहे.
>नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर
कल्याण तालुक्यातील सात हजार ६५ शेतकºयांचे एक कोट सात लाखांचे तर अंबरनाथ तालुक्यातील सात हजार शेतकºयांचे दोन कोटी ६० हजार आणि ठाणे तालुक्यामधील ६९७ शेतकºयांचे १३ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाकडून राज्य सरकारकडे गेला आहे. मात्र, त्यास अनुसरून प्राप्त होणारी २८ कोटी ८४ लाख ९९ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी अद्यापही वंचित असल्यामुळे त्यांच्यात प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Farmers await compensation of 90 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.