फॅन्सी कंठीचा बोलबाला
By Admin | Updated: September 4, 2016 03:11 IST2016-09-04T03:11:45+5:302016-09-04T03:11:45+5:30
गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी वेगवेगळे दागिने खरेदी करताना काय घेऊ

फॅन्सी कंठीचा बोलबाला
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भक्तांची ज्वेलरीच्या दुकानांमध्ये गर्दी उसळली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी वेगवेगळे दागिने खरेदी करताना काय घेऊ अन् काय नको घेऊ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. दागिन्यांमधील वैविध्य डोळे दिपवून टाकणारे असले तरी ‘फॅन्सी कंठी’चा सर्वाधिक बोलबाला आहे.
केवळ चांदीचेच दागिने नाहीत, तर सोन्याचा मुलामा दिलेले अस्सल सोन्यासारखे दिसणारे दागिने उपलब्ध आहेत. गणेशमूर्तीच्या गळ्यात, हातात, पायात सोनेरी रंगाने रंगवलेले दागिने असतात. मात्र, बाप्पाला सजवण्याचा भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. त्यामुळे त्या दागिन्यांवर हे दागिने घातले जातात. सोनेचांदीच्या दागिन्यांबरोबर इमिटेशन ज्वेलरीमध्ये नवनवे प्रकार उपलब्ध आहेत. कंठीमध्ये मोदक कंठी, मोत्याची कंठी, श्रीमंत हार, फॅन्सी कंठी ६९९ ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. बाप्पाच्या उपरण्यांमध्ये डायमंड, मोती आणि गोल्डन उपरणे असे तीन प्रकार असून ते ३९९ रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मुकुटामध्ये यंदा नवीन प्रकार आले असून यात फेटा मुकुट, वेणी मुकुट, बालाजी मुकुट पाहायला मिळत आहे. ४९९ रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. सोंडपट्टीमध्ये मण्यांची, झालर व डायमंड हे तीन प्रकार असून ते ४९९ रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मूषकराज यंदा काळ्या रंगामध्ये आला आहे. २९९ ते दोन हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. भीकबाळी, कान, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दूर्वाचा (पान ३ वर)