शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र कुटुंबाची विण झाली घट्ट, कोरोना काळात कौटुंबिक संवादात वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:33 IST

कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचा आधार घेतला असून मागील पावणेदोन महिने नागरिकांना सक्तीने घरी बसावे लागले. या काळात अनेकांना रोजगाराला मुकावे लागले असून आर्थिक कळ सोसावी लागत आहे. एका बाजूने ही झळ सोसताकोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.ना दुसरीकडे मात्र एवढा मोठा कालावधी एकत्र घालविल्यानंतर कुटुंबीयांमधील संवाद वाढून वातावरण सकारात्मक बनल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पालघर जिल्हा हा मुंबई आणि उपनगराला लागून असल्याने ग्रामीण भागातील शिकलेले लोक शहरात वास्तव्यास गेले, काहींनी शेती सोडून औद्योगिक वसाहतीत नोकरी स्वीकारली. स्थानिक नोकरीकरिता ये-जा करू लागले. चर्चगेट ते डहाणू लोकल सेवा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढले. दरम्यान आर्थिक सुबत्ता आणि शहरी मानसिकतेमुळे भावकीतील दुरावा वाढला. शेती करणाऱ्या कुटुंबातील सदस्याला कमी लेखले जाऊ लागल्याने अबोला, भांडणाच्या प्रसंगात वाढ झाली. शेजाºया-शेजाऱ्यांमध्येही विसंवाद वाढलेला दिसला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन अमलात आणल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. यामुळे एकटेच राहणाºयांचा दिवस जाता जाईना. तर दुसºया टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शेतकºयांना शेतमाल निर्यात आणि कृषी कामासाठी बाहेर पडता येऊ लागल्याने शेतकºयांचे महत्त्व वाढले. त्यामुळे इच्छा नसली तरी गरज म्हणून शेतरस्ता विसरलेल्यांची पावले वडिलोपार्जित शेतजमिनीकडे वळू लागली.पूर्वी कौटुंबिक वादामुळे शिवारातील करवंद, धामनं, ताडगोळे, आंबा, चिंचा, बोकरं, काजू अशा रानमेव्याची नासाडी व्हायची, मात्र आता संपूर्ण कुटुंब गुण्यागोविंदाने त्याचा आस्वाद घेऊ लागली आहेत. या मनोमीलनामुळे ओस पडलेल्या शेतीच्या तुकड्यांवर भावंडांनी एकत्रित येऊन कुंपण घातल्याने शेतीचे महत्त्व अधोरेखित झाल्याची उदाहरणे गावागावातून पाहायला मिळत आहेत. ही तेढभावना कमी झाल्याने आगामी खरीप हंगामात जिल्ह्यातील भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असून शेतीला सुगीचे दिवस आल्याची सकारात्मकता कृषीभूषण यज्ञेश सावे यांनी बोलून दाखवली आहे.लॉकडाउनमुळे एकलकोंडे जीवन जगलेल्यांना एकत्र कुटुंबाचे महत्त्व उमगले आहे. मनातील दुराव्यामुळे जमिनीवर ओढण्यात आलेली तेढीची रेषा पुसट बनल्याने आगामी खरीप हंगामात त्याचा सकारात्मक बदल शेती क्षेत्रातून नक्कीच दिसून येईल.- कृषिभूषण यज्ञेश सावे

टॅग्स :FamilyपरिवारSocialसामाजिक