शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे अनेकांनी घराकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 06:37 IST

लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते.

जितेंद्र कालेकर -ठाणे : कौटुंबिक कारणातून तसेच प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही  ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून ३,१९४ जण बेपत्ता झाले. त्यातील १,७९७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.    लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. काहींना अल्पवयातच आपल्या जोडीदाराकडे जाण्याची ओढ लागते. मग, घरातील विरोध झुगारून पळून जाण्याची तयारी ही मुले ठेवतात. अनेक प्रकरणांत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत ती नेमकी कशामुळे व कशी बेपत्ता झाली, याची माहिती सुरुवातीला उपलब्ध नसते. त्यामुळे यात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अपहरण झाले असल्यास संबंधित आरोपींचाही शोध घेतला जातो.कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस तत्काळ तपास सुरू करतात. तक्रार मात्र २४ तासांनी दाखल होते. २०१९ मध्ये २०३० पुरुष तर २,४३२ महिला बेपत्ता झाल्या. त्यातील १,६९६ पुरुष व २,१५४ महिलांचा शोध लागला आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. 

घर सोडून जाण्याचे कारणव्यक्ती व कुटुंबपरत्वे मुले, मुली आणि प्रौढ व्यक्तींमध्ये घर सोडण्याची कारणे ही वेगवेगळी असली तरी बऱ्याच प्रकरणांत पती-पत्नींमधील विकोपाला जाणारे वाद, प्रेमप्रकरणामध्ये घरातून लग्नाला विरोध असल्यास मुले आणि मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय कर्जबाजारीपणा, मनोरुग्ण किंवा स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्ती घरातून बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.२०२० मध्ये एकूण ३,१९४ बेपत्ता झाले. तर १,७९७ जणांचा शोध लागला.

 

टॅग्स :Familyपरिवारthaneठाणे