लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाहतुकीचे नियमभंग करून तीनहातनाका येथे दुचाकीवरून चुकीच्या दिशेने विनाकागदपत्रांसह आलेल्या नरसिंह मिटला (५०, रा. कन्नमवारनगर, विक्रोळी) या तोतया सहायक पोलीस निरीक्षकाला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास तीनहातनाका येथून मुलूूंडकडे एका दुचाकीवरून तो जात होता. तो चुकीच्या दिशेने विनाहेल्मेट आल्याने नौपाडा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने आपण पोलीस अधिकारी असल्याचा दावा केला. त्यासाठी त्याने कुर्ला नेहरुनगर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षकाच्या गणवेशातील स्वत:चा फोटोही दाखविला. त्यावरून पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर तो तोतया असल्याचे आढळले. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय पवार यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली............................................
ठाण्यात वाहतूक नियम भंग करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:31 IST
पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो दाखवून बिनधास्तपणे वाहतूकीचे नियमांचे उल्लंघनही करणाºया नरसिंह मिटला या तोतयाला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली केली आहे.
ठाण्यात वाहतूक नियम भंग करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद
ठळक मुद्देविनाहेल्मेट, कागदपत्रे नसलेला दुचाकीस्वारनौपाडा वाहतूक शाखेची कारवाईगणवेशाातील फोटोही दाखविला