मोबाइल पळविणारा तोतया पोलीस अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:00 AM2018-07-30T00:00:14+5:302018-07-30T00:10:17+5:30

ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट्यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़

Detecting mobile police officer detained | मोबाइल पळविणारा तोतया पोलीस अधिकारी अटकेत

मोबाइल पळविणारा तोतया पोलीस अधिकारी अटकेत

googlenewsNext

नाशिक : ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट्यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ सचिन अरुण आचार्य (३२, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे महागडे आठ मोबाइल व सव्वा लाख रुपये किमतीची चोरीची अ‍ॅव्हेंजर दुचाकी असा तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे गत काही महिन्यांपासून तो नाशिकमधील हॉटेलमध्ये राहात होता़  सिडकोतील बबलू राठोड यांनी सॅमसंग ए-१ प्लस हा मोबाइल विक्री करण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती़ या जाहिरातीवरून संशयित आचार्य याने १२ जुलै रोजी फोन केला व नाशिक तालुका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक कांबळे असे सांगितले़ यानंतर मोबाइल खरेदीसाठी व पाहण्याच्या निमित्ताने तालुका पोलीस ठाण्याच्या गेटवर बोलवले़ यानंतर संशयित आचार्य हा आला व कांबळे हे माझे वडील असून, त्यांना मोबाइल व बिल दाखवून येतो व पैसे घेऊन येतो असे सांगून दुसºया गेटने फरार झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रमाणेच म्हसरूळ पोलीस ठाण्यातही संशयित आचार्य याने मोबाइल दाखविण्याची नावाखाली पळवून नेला होता़
दरम्यान, आचार्य याने मुंबईतही घरफोड्या व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक योगीता नारखेडे, राजेंद्र शेळके, सुनील जगदाळे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, अरुण भोये, सागर हजारी, जयलाल राठोड, अमित शिंदे, संतोष लोंढे, विशाल पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़
पळ काढला होता
सरकारवाडा पोलीस संशयिताचा शोध घेत असताना आठवडाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयाजवळ संशयित आचार्य हा अ‍ॅव्हेंजर दुचाकीवर उभा होता; मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. त्यास पाठलाग करून पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडले़ त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून आठ मोबाइल व मुंबईहून चोरलेली सव्वा लाखाची अ‍ॅव्हेंजर दुचाकी असा ३ लाख आठ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

Web Title: Detecting mobile police officer detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.