शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक

By नितीन पंडित | Updated: January 26, 2024 15:52 IST

हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात होता.

भिवंडी: शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी दोन जणांना अटक केले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.शादाब इस्लाम खान वय ३३ वर्ष रा. नवलीफाटा पालघर व चेतन रमेशभाई गांधी वय ३४ वर्ष रा. कांदिवली पश्चिम असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

           शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे व पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोन्यांमधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किंमतीचा मधून सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल व ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.

         आरोपी चेतन गांधी याने मे.जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जि.पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्टरी उघडली होती.बडीशेपचा टाकाऊ हिस्सा व लाकूड यात केमिकल व केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हा जीरा बनविण्यात येत होता.यासाठी कच्चामाल गुजरात येथील उंजा येथून येत होता.त्यांनतर जीरा बनवून तो बाजार भावाच्या अर्ध्या किंमतीत विकला जात होता.आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यावसाय सुरु केला असून बनावट जीरा वाशी नवी मुंबई एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे व आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल व धाब्यांवर विक्री केला जात होता. हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात होता.

       शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

       सदर कारवाई शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे,पोलीस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील,पोलीस शिपाई नरसिंग क्षीरसागर, रवी पाटील, तौफिक शिकलगार यांच्या पथकासह अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजीत चिलवंते यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस