शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांना बनावट कोविड अहवाल, गुजरातला जाणाऱ्या बसमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 05:42 IST

Crime News :कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यांत जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

मीरा रोड : खासगी ट्रॅव्हल्सने गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्सवालेच जास्त पैसे आकारून चक्क बनावट कोविड चाचणी अहवाल बनवून देत असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून नीता व पवन ट्रॅव्हल्समधील आरोपींचा काशिमीरा पोलीस शोध घेत आहेत. बनावट दाखले देणारी मोठी टोळीच सक्रिय असल्याची शक्यता आहे.कोरोनाचा संसर्ग फोफावल्याने अन्य राज्यांत जाणाऱ्या वा येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. मुंबई परिसरातून गुजरातला बसने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या काही ट्रॅव्हल्सचे मालक व चालक हे प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना बनावट कोविड चाचणी अहवाल देत असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुराडे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास घोडबंदर नाका येथे मिळालेल्या माहितीनुसार पवन ट्रॅव्हल्सची बस अडवली. बसमध्ये ३१ प्रवासी तसेच बसचालक व वाहक असे मिळून ३३ जण होते. त्यांच्याकडील आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालाची मागणी केली असता १९ प्रवासी आणि चालक व वाहक यांच्याकडे असलेले आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल बनावट असल्याचे आढळले. बसमध्ये नियमही पाळले गेले नव्हते.कोविड चाचणी अहवाल बनवून देतो सांगून ट्रॅव्हल्सवाल्यांनीच या १९ प्रवाशांकडून प्रत्येकी ३०० रुपये घेऊन हे बनावट चाचणी अहवाल बनवून दिले होते, तर अन्य १२ प्रवाशांकडून चाचणी अहवाल बनवून देण्यासाठी प्रत्येकी ३०० रुपये घेण्यात आले होते. मात्र, अहवालच दिला नाही. काशिमीरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक,व्यवस्थापक अद्याप फरार    अटक आरोपींपैकी बसचालक दीपसिंग चौहान व देवीसिंग चावडा आणि वाहक जितेंद्रसिंग चौहान हे तिघेही अहमदाबादमध्ये राहणारे आहेत, तर पवन ट्रॅव्हल्सचा मालक हितेशभाई, नीता ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक संदीप व कर्मचारी जिग्नेश पटेल या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmira roadमीरा रोड