पावणे चार लाखांची फसवणूक
By Admin | Updated: November 16, 2016 05:44 IST2016-11-16T05:44:01+5:302016-11-16T05:44:01+5:30
आमच्या व्यवसायात २० लाखांची गुंतवणूक करा आणि दर महिना एक लाखांची रोकड घ्या, अशी जाहिरात ‘अभिलाषा अँड असोसिएटस’तर्फे इंग्रजी

पावणे चार लाखांची फसवणूक
ठाणे : आमच्या व्यवसायात २० लाखांची गुंतवणूक करा आणि दर महिना एक लाखांची रोकड घ्या, अशी जाहिरात ‘अभिलाषा अँड असोसिएटस’तर्फे इंग्रजी वर्तमानपत्रात केली गेली. त्यानुसार, मानपाडा भागातील भूपेंद्रनाथ सिंग हे ‘अभिलाषा’च्या पराग कुलकर्णी यांना त्यांच्या घोडबंदर रोडवरील पॅलेसिया अपार्टमेंटमध्ये भेटले. तिथे दरमहा मोठ्या रकमेचे आमिष दाखवून वस्तू विकण्याचा फंडाही त्यांनी पटवून दिला. त्यांनी पराग यांना पाच लाख रुपये दिले. त्यातील चार लाखांचे ट्रेडिंग करून, त्यापोटी सिंग यांना कोणताही मोबदला दिला नाही. आॅगस्ट ते १५ आॅक्टोबर २०१६ या कालावधीतच सिंगकडून तीन लाख ७० हजार आॅनलाइन ट्रान्सफर करून घेतले. महिना उलटला, तरी त्यांना मोबदला आणि ठरलेली पगाराची रक्कमही दिली नाही. अखेर कुलकर्णीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)