दोन ट्रान्सफॉर्मरसह बंद पोल हटविण्यात अपयश
By Admin | Updated: September 14, 2015 23:24 IST2015-09-14T23:23:43+5:302015-09-14T23:24:04+5:30
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. त्यावर, मात करण्यासाठी सेवारस्ता हा तोडगा काढला आहे. मात्र, शहरातील तीन ठिकाणी महावितरण कंपनीचे दोन

दोन ट्रान्सफॉर्मरसह बंद पोल हटविण्यात अपयश
ठाणे : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. त्यावर, मात करण्यासाठी सेवारस्ता हा तोडगा काढला आहे. मात्र, शहरातील तीन ठिकाणी महावितरण कंपनीचे दोन ट्रान्सफॉर्मर आणि एक मोठा विद्युत खांब पैशांचा भरणा करूनही पालिकेला हटवता आलेले नाहीत. त्यामुळे दोन ठिकाणी सेवारस्ता अडकला आहे.
टी. चंद्रशेखर हे आयुक्त असताना त्यांनी रस्त्यालगतची अनेक अतिक्र मणे हटवून सेवारस्त्याची संकल्पना राबविली होती. मात्र, त्यांच्यापश्चात हे रस्ते पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. अनेक ठिकाणचे अडथळे अद्यापही दूर झालेले नाहीत. त्यापैकी तीन अडथळे दूर करण्यासाठी पालिकेने महावितरण कंपनीला सुमारे १० वर्षांपूर्वीच पैसे भरले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हे रस्ते अडथळ्यांच्या शर्यतीत अडकले आहेत. यात मानपाडा येथील पेट्रोलपंपासमोरील रस्ता महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमुळे गेल्या १० वर्षांपासून अडकला आहे. आहे. हा ट्रान्सफॉर्मर हलविण्यासाठी लागणारे शुल्क पालिकेने अदा केले आहे. मात्र, तो हटविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा प्रशासनाने केला नाही. तसाच प्रकार गांधीनगर ते टिकुजिनीवाडीदरम्यान आहे. या ठिकाणी असलेल्या पाइपलाइन आणि ट्रान्सफॉर्मरला हटविण्यात पालिकेला यश आलेले नाही. दरम्यान, साकेत मार्गावरील एक भला मोठा विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध उभा आहे. विशेष म्हणजे, त्यातून गेलेल्या ताराही बंदावस्थेत आहेत. तरीही, त्या हटविल्या जात नाहीत.