कारखान्याला आग
By Admin | Updated: November 15, 2016 04:13 IST2016-11-15T04:13:57+5:302016-11-15T04:13:57+5:30
तारापूर एम्.आय.डी.सी. मधील एका रासायनिक कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागली. ती प्रथम शेजारच्या कारखान्यात थोडी तर नंतर

कारखान्याला आग
बोईसर : तारापूर एम्.आय.डी.सी. मधील एका रासायनिक कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागली. ती प्रथम शेजारच्या कारखान्यात थोडी तर नंतर मागील कारखान्यात मोठ्या प्रमाणात पसरली. एकूण पाच बंबाद्वारे ती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून तिचे निश्चित कारण व हानी अद्याप कळू शकलेले नाही. तारापूर एम.आय.डी.सी.मधील मोहिनी आॅर्गेनिक्स प्लॉट नं. टी-९१ या आॅईल तयार करणाऱ्या कारखान्यास दुपारी दीड ते पावणे दोनच्या दरम्यान लागलेल्या आगीने अल्पावधीत रौद्र रुप धारण केले. धुराचे काळेकुट्ट लोळ, खूप दूरवरुन दिसत होते, रसायनांचे ड्रम आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीची भीषणता वाढत गेली.तारापूरएम्.आय.डी.सी. चे तीन, तारापूर अणुऊर्जा केंद्र व पालघर नगर परिषद यांचे प्रत्येकी एक असे पाच बंबा आग विझवत होते. डहाणू थर्मल पॉवर व विरार वसई महानगरपालिकेकडूनही अतिरीक्त बंब मागविण्यांत आले होते. ही आग शेजारच्या कारखान्यात पसरली.