शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; १९ लाखांचा घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:05 IST

फेसबुकवर झालेली मैत्री वसईतील एका गृहिणीला चांगलीच महागात पडली.

ठाणे : फेसबुकवर झालेली मैत्री वसईतील एका गृहिणीला चांगलीच महागात पडली. या मैत्रीतून विविध भेटवस्तू पाठवल्याचा बहाणा करून दोघांनी त्यांना १९ लाख १५ हजारांचा गंडा घातला. याबाबत ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्तांकडे केलेल्या अर्जानुसार,या प्रकरणाची चौकशी ठाणे खंडणी विरोधी पथकामार्फत केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

वसईतील ४२ वर्षीय तक्रारदार महिला या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत डिसेंबर २०१७ ते जुलै २०१८ दरम्यान नोकरी करत होत्या. याचदरम्यान,त्यांनी स्वत:चा आयात-नियात व्यापार सुरू करण्याचे ठरवले. त्यातून त्यांनी फेसबुक,इन्स्टाग्राम आणि टिष्ट्वटर यावर त्यांच्या ओळखीच्या विदेशी कंपन्यांमधील विविध पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू केला होता.याचवेळी इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख जो डेरीक याच्याशी झाली. त्याने कॉलॉफोर्नियात ज्युस व वाइनचा मोठा बिजनेस असल्याचे भासवले. आपली अनेक मोठ्या ब्रँडच्या कंपनी मालकांशी मैत्री असून मी तुमच्या व्यवसायात मदत करू शकतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

२७ आॅगस्ट २०१८ रोजी त्याने त्यांना फेसबुक मसेंजरवर एक मेसेज पाठवला. त्यावेळी त्याने आपल्या कंपनीला एक वर्ष पूर्ण होते. त्यानिमित्त त्यांची कंपनी विविध भेटवस्तू वाटप करत असून त्या तुम्हालादेखील पाठवणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा पत्ता द्या, असे सांगून त्यांच्याकडून मोबाईल क्र मांक व घराचा पत्ता घेतला. त्यानंतर त्याने त्याचदिवशी लेदर बॅग, पर्स,मनगटी घड्याळ,चेन लॉकेटस्,लॅपटॉप व इतर काही वस्तू कुरिअर केल्या. २८ आॅगस्ट रोजी त्याने त्यांना मोबाइल क्रमांकावर सुमीतकुमार नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने सीमा शुल्क विभाग, दिल्ली येथील सहायक आयुक्त असल्याचे सांगितले. तसेच त्याने त्यांना परदेशातून दिल्ली येथे कुरिअर आल्याचे सांगून त्यावर ६८ हजारांचा कर भरावा लागेल असे सांगितले. तो न भरल्यास कायदेशीर कारवाईसह अटकेची भीती दाखवली.अटकेची दाखवली भीतीसुमीतकुमार याने दिलेल्या बँकेच्या खात्यात पैसे भरले. त्यानंतर त्याने त्या भेटवस्तूंमध्ये एक किलो सोने मिळाले सांगून कर भरावा लागेल, असे सांगितले. अटकेची भीती दाखवून एकूण १९ लाख १५ हजारांची फसवणूक केली.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी