ठाणे : राज्य शासनाने रद्द किंवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी काही अटी व शर्ती दिल्या आहेत. त्यामुळे रद्द किंवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण करावे असे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) विकास पांडकर यांनी केले आहे.प्रचलित नियमानुसार परवाना मुदत संपल्यानंतर ६ महिन्यामध्ये अर्ज न केल्यास परवान्याचे नूतनीकरण करण्याची अनुमती असणार नाही. परवाना नूतनीकरण न होण्यामागे एक रकमी कराची रक्कम, परवाना कर , वित्त दात्याची ना हरकत प्राप्त न होणे, वाहनावर केसेस प्रलंबित असणे, योग्यता प्रमाणपत्र, नूतनीकरण न केल्यामुळे दंड, उशिरा परवाना नूतनीकरणासाठीचे विलंब शुल्क देय असणे यासारखी प्रमुख कारणे आहेत. अशा विविध कारणांनी परवाना रद्द किंवा व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षाच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा एक वेळ संधी दिली गेली आहे. े नुतनीकरणासाठी मुंबई महानगरात २० हजार रु पये तर राज्यातील इतर क्षेत्रात १५ हजार रुपये एवढे एक वेळचे नुतनीकरण शुल्क आकारण्यात येईल. ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
आॅटोरिक्षा परवाने नूतनीकरणासाठी मुदतवाढ
By admin | Updated: October 6, 2015 23:56 IST