ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:37 IST2017-12-02T18:35:36+5:302017-12-02T18:37:02+5:30
ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला
ठाणे : नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.
ठाणे जिल्हयातील सर्व मतदारांनी व विशेषत: १८ ते २१ वयोगटातील तरुणांनी, नवविवाहीत महिलांनी आपले नाव मतदार यादीत आहे किवा नाही याची खात्री करुन जर मतदार यादीत नाव नसेल तर नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात यावी असे याव्दारे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.