भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:49 IST2020-12-26T21:49:00+5:302020-12-26T21:49:00+5:30
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.

भिवंडीत ट्रांसफार्मरचा स्फोट सुदैवाने जीवित हानी टळली
भिवंडी : भिवंडी शहरातील कचेरी पाडा येथील मुला मुलींचे बालसुधार गृहाच्या भिंतीला लागून असलेला विद्युत ट्रांसफार्मरला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागून स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे ट्रांसफार्मर मधील ऑइल रस्त्यावर उडाले होते.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे हा ट्रांसफार्मर बाल सुधार गृहाच्या भिंतीला लागून असल्याने येथील बालसुधारगृहातील मुला मुलींना कोणतीही इजा अथवा हानी झाली नाही.