मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:57 IST2018-10-22T04:57:24+5:302018-10-22T04:57:26+5:30

मीरा रोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

Explosion in Hotel in Mira Road | मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट

मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट

मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता मीरारोड पोलिसांनी वर्तवली असून त्यांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एसीची देखभाल नीट नसल्याने हा स्फोट झाल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
कनिकया येथील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये तळमजल्यावर फूड किंग नावाचे फास्टफूड हॉटेल आहे. याठिकाणी प्रल्हाद बेहरा, फताबुद्दिन, रंजन बेहरा, आणि कबीर याच्यासह पाच कामगार काम करण्यासाठी हॉटेलात आले असता अचानक स्फोट झाला.

Web Title: Explosion in Hotel in Mira Road