अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा प्रकार उघड
By Admin | Updated: March 23, 2017 01:30 IST2017-03-23T01:30:55+5:302017-03-23T01:30:55+5:30
पैशांसाठी पोटच्या मुलीची शरीरविक्रय व्यवसायासाठी विक्री करण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलीची बहीण व दलाल यांना पोलिसांनी

अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा प्रकार उघड
मीरा रोड : पैशांसाठी पोटच्या मुलीची शरीरविक्रय व्यवसायासाठी विक्री करण्याचा प्रयत्न करणारी आई, मुलीची बहीण व दलाल यांना पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे.
ट्रान्सफॉर्मिंग लाइव्ह फाउंडेशन या संस्थेचे मनोहर वाघेला यांना प्रवीण पुजारी (३५) या दलालामार्फत चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा शरीरविक्रयासाठी ९० हजारांचा सौदा ठरत असल्याचे समजले. वाघेला यांनी ही माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अक्षीक्षक डॉ. महेश पाटील यांना दिली. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकटेश आंधळे व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहायक निरीक्षक संजय बांगर यांना कारवाई करण्यास सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मीरा रोडच्या जीसीसी क्लबजवळील पूनम अमिषा इमारतीच्या एका सदनिकेत आंधळे व बांगर यांच्यासह आसवले, गोलाईत, चासकर, गावडे, यंबर यांनी धाड टाकून दोन महिलांसह प्रवीण याला अटक केली. तेथे सापडलेल्या १४ वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी महिलांची चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. आरोपींमध्ये मुलीची आई, तर तिची मोठी बहीण असल्याचे निष्पन्न झाले. मुलीचे वडील राजस्थानमध्ये शेती करतात. सदनिका त्यांच्या मालकीची आहे. बहीण ही बोरिवलीमधील बारमध्ये काम करत होती. (प्रतिनिधी)