www.lokmat.com वर अनुभवा सत्तासंघर्ष
By Admin | Updated: September 21, 2014 04:09 IST2014-09-21T01:59:32+5:302014-09-21T04:09:18+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी lokmat.com नं सुरू केला आहे

www.lokmat.com वर अनुभवा सत्तासंघर्ष
ऑनलाइन लोकमत - मुंबई
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून मतपेटीच्या माध्यमातून रंगणारा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. अनेक क्षेत्रंमध्ये देशात अव्वल स्थानी असलेल्या या राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी सुरू झालेल्या या संघर्षात कोण बाजी मारते हे अवघ्या महिन्याभरात स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांची जागावाटपावरून सुरू असलेली रु सवाफुगवी, स्वबळावर लढण्याची खुमखुमी या गोष्टी एकीकडे सुरू असतानाच सर्व पक्ष आपली ताकद आजमावण्यासाठी आता कंबर कसून मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातील नंबर एकचे दैनिक असणारे लोकमत वृत्तपत्र तसेच www.lokmat.com च्या माध्यमातून या सत्तासंघर्षाच्या घडामोडी वाचकांर्पयत पोचवण्यास सज्ज झाले आहे.
केवळ होऊ घातलेल्या निवडणुकीच्याच नाही, तर 1962 ते 2009 दरम्यान झालेल्या 11 निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी www.lokmat.com नं सुरू केला आहे ‘सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक 2014’ हा विशेष विभाग.
काय आहे या विभागात
1962 सालच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2009 च्या निवडणुकांचे निकाल.
आत्तार्पयंतच्या सगळ्य़ा निवडणुकांचा मतदारसंघनिहाय आढावा.
च्या सगळ्य़ा म्हणजे 11 निवडणुकांमध्ये झालेली सगळ्य़ा पक्षांची कामगिरी.
आत्तार्पयतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्य़ा मुख्यमंत्र्यांची संक्षिप्त ओळख व त्यांचा कार्यकाळ. हे सगळं आहे सुटसुटित अशा टेबल फॉर्ममध्ये.
च्मतदार यादीत तुमचं नाव शोधता यावं याची सुविधाही निवडणूक आयोगाच्या सहकार्याने www.lokmat.com वर देण्यात आली आहे.
या शिवाय आपल्या सोबत असतील, गेल्या पन्नास वर्षाचा राजकीय पट उलगडणारे स्लाईडशोज, विविध घडामोडींवर वाचकांना मत मांडायची सोय देणारे पोल, दिवसभरातल्या ताज्या घडामोडी अव्याहतपणो तुमच्यार्पयत पोचवणा:या लाईव्ह न्यूज आणि या रणधुमाळीचा साद्यंत वृत्तांत देणारा निवडणूक विशेष हा विभाग.
चला तर मग www.lokmat.com वरील ‘सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक 2014’ च्या माध्यमातून तयार व्हा निवडणुकीचा थरार अनुभवायला.