शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 17:23 IST

वाशी मार्केटमधील संपामुळे कल्याणची आवक वाढली

डोंबिवली : माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे वाशी एपीएमसी मार्केटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटला भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या संपामुळे शेतकऱ्यांनी आपला माल वाशीऐवजी कल्याणला नेला आहे. त्यामुळे एरव्ही १५० गाड्यांची आवक होणाऱ्या कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये आज ३०० पेक्षाही जास्त भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये इतकी प्रचंड आवक झाल्यानं भाजीपाल्याचे दरही कोसळले आहेत. तर वाशी किंवा मुंबईत भाजीपाला जात नसल्यानं ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यातूनही कल्याणला किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे कल्याण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान, व्यापाऱ्यांचं एकमत झालं, तर उद्या कदाचित कल्याण मार्केट बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीkalyanकल्याण