पालघर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात एक मेडिको 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:04 AM2021-02-17T00:04:21+5:302021-02-17T00:05:01+5:30

Palghar district : पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.

Examination of 3 lakh 34 thousand 838 swabs in Palghar district, one Medico in the district | पालघर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात एक मेडिको 

पालघर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात एक मेडिको 

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे; मात्र तरीही रुग्णवाढ होऊ नये यासाठी प्रशासन अद्यापही काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी आयसीएमआरने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या एकमेव मेडिकोव्यतिरिक्त मुंबईच्या 
जे.जे. रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातून एकूण ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबच्या तपासणी केल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हजारांहून जास्त रुग्ण वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामध्ये ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर डहाणूमध्ये २ हजार १९७, जव्हारमध्ये ६२१, मोखाडामध्ये २८७, तलासरीमध्ये २७५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३६६, विक्रमगडमध्ये ५९९, वाडामध्ये १ हजार ८७९ रुग्ण आढळलेले आहे. जिल्ह्यात आजवर ४५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले असले तरी ४४ हजारांहून जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर जिल्ह्यातील बव्हंशी व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत,  मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. स्वॅब घेण्यासाठी तसेच अन्य बाबींसाठी शासन पातळीवरून, जिल्हाधिकारी आणि आयसीएमआरकडून निधी प्राप्त झाला होता. दरम्यान, आता कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. 

लॅबचे पुढे काय?
लॅब पुढेही चालू राहणार आहेत. कारण आता रुग्णसंख्येत पुन्हा वाढही होत आहे. कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी प्रत्येक जिल्ह्यात लॅब उभारण्यात आल्या आहेत. त्यात मेडिको (मेडिकल सुविधा आधीपासून असलेले उदा. वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय) आणि नॉन मेडिको (मेडिकल सुविधा आधी नसलेले उदा. विद्यापीठ) असे दोन प्रकार आहेत.

स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मुंबईला
कोरोनाकाळात पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे स्वॅब घेऊन ते मुंबईला पाठवले जात होते. त्यामुळे त्या स्वॅबचा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा अवधी जात होता. यामुळेही नाराजी व्यक्त होत होती. 

एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाही
ग्रामीण भागातील रिपोर्टमध्ये क्युरी नव्हत्या, मात्र सुरुवातीच्या काळात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रिपोर्टबाबत निगेटिव्हचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याच्या तक्रारी होत्या. यावर महानगरपालिका प्रशासनाने काही लॅबला नोटिशीही बजावल्या होत्या. 

१० जणांचा स्टाफ
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाने लॅबमध्ये ८ ते १० जणांच्या स्टाफची नियुक्ती केली होती. 

Web Title: Examination of 3 lakh 34 thousand 838 swabs in Palghar district, one Medico in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.