उल्हासनगर : माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. स्वातंत्रदिनापूर्वी निर्णय न घेतल्यास मुंबईतील हुतात्मा चौकात आत्महदनाचा इशारा त्यांनी दिला आहे.माजी सैनिकांना व्यवसायासाठी भूखंड ठेवण्याची मागणी पाटील यांनी यापूर्वीच केली असून उपोषणाही केले होते. प्रांत कार्यालय व तहसीलदार यांनी भूखंडाबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची हमी दिल्यावर, त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. अखेर त्यांनी पुन्हा सरकार दरबारी पाठपुरावा केला. स्वातंत्रदिनापूर्वी माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड न ठेवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बिल्डर व इतर समाजसेवी संस्थांसाठी भूख्ांडाची खैरात करणाºया सरकारकडे माजी सैनिकांसाठी राखीव भूखंड नसल्याबाबत रोष व्यक्त केला आहे.
माजी सैनिकाचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:29 IST