शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 03:35 IST

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती.

- स्नेहा पावसकरठाणे : भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. आपल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे; पण देशात खूप गरीबी आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळत नाही. अस्वच्छता, धूम्रपान या प्रमुख समस्या आहेत. विचारांचे हे ‘स्वातंत्र्य’ पाहायला मिळाले ते सिग्नल शाळेतील अवघ्या १0 ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी व्यक्त केलेल्या निखळ भावनांमध्ये.गेली अनेक वर्षे समाजातील सोयीसुविधांपासून दूर असलेली ही मुले ठाण्यातील तीनहातनाका येथे सुरू झालेल्या सिग्नल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आलीत. सिग्नलवर केवळ झेंडे विकणे आणि शक्य झाल्यास दूर उभे राहून एखादा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पाहणे, इतकेच त्यांच्या नशिबी असायचे. आजही आम्ही झेंडे घेऊन येतो. ते सिग्नलवर विकतो; मात्र शाळा सुटल्यावर. झेंडा विकताना त्याचे व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आम्हाला माहित आहे. सिग्नल शाळेत प्रवेश घेतल्यापासून आम्ही आमच्या शाळेत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करू लागलो आहोत. आम्ही झेंड्याला सलामी देतो, लेझीम खेळतो, ध्वजगीतासह स्वातंत्र्य दिनाची गाणी म्हणतो. त्यावेळी खूप आनंद होतो, असे सिग्नल शाळेतील मुले म्हणाली.आज देशात अनेकांना राहायला स्वत:ची घर नाहीत. लोकं खूप गरीब आहेत. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतयं. धूम्रपानची समस्या आहे. या समस्या संपल्या पाहिजे. आम्हाला शिक्षणाची सोय उपलब्ध झाली; पण आजही अनेक मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यांच्या आईवडिलांनी मुलांना शिकविले पाहिजे. शिक्षण सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला शिक्षण घ्यायला खूप आवडते. शिकून पुढे पोलीस, पायलट, इंजिनिअर व्हायचं आहे, अशी या चिमुकल्या डोळ्यांनी रंगवलेली स्वप्नेही सांगितली.मोदींना ओळखतात; बाळासाहेब आवडीचे नेतेसिग्नल शाळेतील ही मुले केवळ अभ्यासातच नव्हे तर सामान्य ज्ञानातही हुशार आहेत. देशाचे पंतप्रधान कोण आहेत, असे विचारले असता, क्षणाचा विलंब न करता अनेकांनी नरेंद्र मोदीअसे तर महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे, ठाण्यातले एकनाथ शिंदेही आम्हाला माहित आहेत आणि आवडतातही, असेही काही मुले यावेळी उत्तरलीत.पैसे कमवायचे असतात ना...स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी सिग्नलवर विकण्यासाठी आम्ही स्वत: आणि अनेकदा एकट्याने कुर्ला किंवा इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये जाऊन झेंडे आणतो. आम्हाला ते कमी किमतीत मिळत असले तरी आम्ही २० रूपयाला विकतो. कारण त्यातून पैसे कमवायचे असतात ना... असे उत्तर निखळ मनाने एका मुलाने दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी