प्रत्येकाने हे वाचायलाच हवं

By Admin | Updated: February 5, 2017 03:09 IST2017-02-05T03:09:41+5:302017-02-05T03:09:41+5:30

डॉ. एडवर्ड यांच्या मते चित्र काढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कौशल्य म्हणूनही ती प्राप्त करून घेता येते, जसे सायकल चालवणं, पोहणं हे अनुभवानं शिकता येतं; तसंच चित्रकलेचंही

Everyone has to read this | प्रत्येकाने हे वाचायलाच हवं

प्रत्येकाने हे वाचायलाच हवं

- मंजिरी दांडेकर

डॉ. एडवर्ड यांच्या मते चित्र काढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कौशल्य म्हणूनही ती प्राप्त करून घेता येते, जसे सायकल चालवणं, पोहणं हे अनुभवानं शिकता येतं; तसंच चित्रकलेचंही आहे. एकदा का या गोष्टी तुम्ही शिकलात की आयुष्यभर त्या तुम्ही विसरू शकणार नाही; पण त्यासाठी सराव मात्र हवा. डॉ. एडवर्ड यांनी या पुस्तकात काही धडे दिले आहेत त्यातून मेंदूत कुंठित झालेली निर्मितीक्षमता शिथिल होऊन आपण निर्मितीक्षम होतो. एखाद्या वस्तूकडे बघण्याची तुमची दृष्टी सुधारली की तीच वस्तू आपल्याला वेगळी वाटते, असं त्यांचं मत आहे. हे खरंही आहे.

अश्विनी एक आत्मविश्वासू हुशार मुलगी. इयत्ता ५ वीपर्यंत ती चित्र काढणं आणि रंगवणं यात गुगूंन जात असे; पण पुढे पुढे मात्र विज्ञानातील आकृत्या काढताना, उदाहणार्थ हृदयाची रचना, फुलपाखराच्या अवस्था, बीज अंकुरणे यासारख्यामधे ती कमी पडू लागली. तिच्या आकृत्या खूपच लहान येत असत. वास्तविक तिचं निरीक्षण चांगलं होतं; पण या व अशा आकृत्या काढताना ती आपला आत्मविश्वास गमावून बसत असे. परिणामी तिच्या गुणांचा आलेख खाली घसरू लागला. त्यामुळे ती निराश झाली. तिच्या लहान आकृत्या मोठ्या करण्याच्या कामी किंवा मोठ्या काढण्यासाठी तिच्या शिक्षकांनी तिच्यातील चित्रकलेला प्रोत्साहन देऊन पाहिलं. काही मदत करू पाहिली; पण ती मात्र स्वत:लाच दोषी समजू लागली.
खरं तर हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं. लहानपणी मुक्ताविष्कार करणारे हात मोठेपणी वास्तववादी चित्रण करताना थरथरतात. यासाठी मला वाटत पालकांनी आपल्या पाल्याच्या लहानपणापासूनच या कलेकडे योग्य लक्ष द्यायला हवं. एखाद्या चित्रकाराचे चित्र पाहिल्यावर त्याला त्याबद्दल विचारले तर तो उत्तर देईल. ‘माझ्या मनात आले. मला वाटले म्हणून काढले. आपण सर्वच जण चित्र काढू शकतो. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील एका विभागातील प्राध्यापिका डॉ. बेट्टी एडवर्ड यांचं ‘ड्राइंग आॅन द राइट साइड आॅफ द ब्रेन’ हे पुस्तक वाचनात आलं. त्यांनी मानवी मेंदूवर संशोधन करून हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी पुस्तकात काही मुलभूत अभ्यासक्रम दिले आहेत. ज्यामुळे माणसातील सर्जनशीलतेला, निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन मिळेल.
डॉ. एडवर्ड यांच्या मते चित्र काढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कौशल्य म्हणूनही ती प्राप्त करून घेता येते, जसे सायकल चालवणं, पोहणं हे अनुभवानं शिकता येतं; तसंच चित्रकलेचंही आहे. एकदा का या गोष्टी तुम्ही शिकलात की आयुष्यभर त्या तुम्ही विसरू शकणार नाही; पण त्यासाठी सराव मात्र हवा. डॉ. एडवर्ड यांनी या पुस्तकात काही धडे दिले आहेत त्यातून मेंदूत कुंठित झालेली निर्मितीक्षमता शिथिल होऊन आपण निर्मितीक्षम होतो. एखाद्या वस्तूकडे बघण्याची तुमची दृष्टी सुधारली की तीच वस्तू आपल्याला वेगळी वाटते, असं त्यांचं मत आहे. हे खरंही आहे. बहुतेक कलाकारांचं म्हणणं असं की, चित्रकलेमुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. छोटे उदाहरण घ्या, एखाद्या वस्तूचं निरीक्षण करताना तिचा आकार, आजूबाजूची जागा, पार्श्वभूमी, त्या वस्तूवरील छायाप्रकाश, रंग या गोष्टी लक्षात घेतल्या की त्या वस्तूकडे बघण्याची दृष्टी बदलेल. आपण एखादं फळ खाताना त्याकडे खाण्यायोग्य वस्तू म्हणून पाहतो; पण त्याच फळाचं चित्र काढताना आपली दृष्टी बदललेली असते. या बद्दलचं त्याचं विश्लेषण पटण्यासारखं आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की, पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्र काढायला वाव दिला, प्रोत्साहन दिलं तर ती वाचायला लवकर शिकतील. स्वत:ला अभिव्यक्त करायला शिकतील. चित्रवाचनामुळे भाषाही सुधारेल. या पुस्तकात त्यांनी चित्रकलेबद्दलचे काही धडे दिले आहेत. प्रयोग दिले आहेत. गेली काही वर्षे वेगवेगळ्या वयोगटातल्या, वेगवेगळ्या व्यावसायातील विद्यार्थ्यांवर करत आहेत.
त्यांच्या मोलाचा सल्ला असा की दिवसभरात कुठलंही चित्रं काढा, कसंही येऊ दे. चित्रावर तारीख व क्रमांक टाकायला विसरू नका, कारण कालांतरात, अनुभवानं तुमचीच प्रगती तुम्हाला समजेल. मग बघा, लागा कामाला. घ्या कागद आणि पेन्सिल आणि भरपूर चित्र काढा. शक्य झाल्यास हे पुस्तकही वाचा.

Web Title: Everyone has to read this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.