शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक स्त्रीने स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे; अमृता फडणवीस यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:17 IST

प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दिला. 

भार्इंदर - प्रत्येक स्त्रीने स्वत:वरील सर्व बंधने झुगारुन स्वत:सह दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अस्त्र फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी मॅक्सस मॉल येथील बँक्विट हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात दिला. 

माजी महापौर गीता जैन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अस्त्र फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी, प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही विशेष गुण असतो पण त्या संसारामध्ये स्वत:ला विसरुन जात असल्याने त्यांचा चांगला गुण समाजापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. महिला सर्व क्षेत्रात अव्वल ठरत असुन त्याच आॅलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवितात, त्या वैमानिक पदावर कार्यरत आहेत, टि-व्टेंटी क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करतात, मंगला मणी नामक वैज्ञानिक महिला आंटार्क्टिकामध्ये उणे ९० डिग्री सेल्शियस तापमानात गेल्या एक वर्षापासून संशोधनाचे कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या अशा चमकदार कार्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वयंरोजगारासाठी अधिकाधिक सरकारी योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच महिलांनी आपला संसार सांभाळून अस्त्र फाऊंडेशच्या आगामी अस्त्रस्त्रोत संस्थेत काम करुन स्वत:ची अर्थवृद्धी वाढवावी. जेणेकरुन महिलांना अर्थस्त्रोत उपलब्ध होण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना देत त्यातून त्यांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान अस्त्र फाऊंडेशनने महिलांसाठी ३ रुपये दराने उपलब्ध केलेल्या सॅनिटरी नॅपकीनसह काही वस्तूंचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच येत्या काही दिवसांत महिलांना अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना ई-स्कूटीचे वाटप करण्यात येणार आहे. त्याची चावी लाभार्थी महिलेला देत त्याचे प्रतिकात्मक उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॉलिवूड गायिका वैशाली सामंत यांच्या ‘लाल मेरी.....’ या गाण्यावर अमृता यांनी देखील सूर छेडला.कार्यक्रमाला महिलांनी अनपेक्षित उपस्थिती दाखविल्याने सभागृहात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर काही महिला सभागृहाच्या बाहेरच बसुन कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. याप्रसंगी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ, मनिषा चौधरी, महापौर डिंपल मेहता, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या मंडळ सदस्या रानी द्विवेदी, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते,  ‘दिदि‘ या महिला संस्थेच्या संस्थापिका रेवती रॉय आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसWomenमहिला