बालमजुरांना प्रशिक्षणासह दरमहा शिष्यवृत्ती
By Admin | Updated: September 26, 2015 22:35 IST2015-09-26T22:35:42+5:302015-09-26T22:35:42+5:30
भंगार, कचरा वेचणारे, मण्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या बाल मजुरांची सुटका करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासह दरमहा १५० रूपये शिष्यवृत्ती दिली जात आहे

बालमजुरांना प्रशिक्षणासह दरमहा शिष्यवृत्ती
ठाणे : भंगार, कचरा वेचणारे, मण्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या बाल मजुरांची सुटका करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासह दरमहा १५० रूपये शिष्यवृत्ती दिली जात आहे. यासाठी संबंधीत बालमजुरांनी ठिकठिकाणी सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदवून प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जिल्ह्यातील भिवंडी, मुंब्रा, टिटवाळा, शहाड आदी ठिकाणी २२ प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. त्यामध्ये ९ ते १४ वर्ष वयोगटातील बालमजुरांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणच्या प्रत्येक केंद्रात सुमारे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. दोन शिक्षकांसह एक व्यवसायिक प्रशिक्षक या विद्यार्थ्याना शिक्षण देत आहेत.