शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

By अजित मांडके | Updated: May 30, 2024 13:11 IST

ठेकेदारांच्या मनमर्जीनुसार निविदा काडून सुद्धा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा

ठाणे  :  ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली असल्याचे दाखविले जात असले तरी ३१ मेच्या आधी नाले सफाई पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील गांधीनगर, कापूरबावडी, नलपाडा, लोकउपवन, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर,वागळे इस्टेट येथील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्यांचा ढीग साचलेलाच दिसून येत असून ठेकेदाराने नालेसफाई त्वरीत न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.महापालिका हद्दीत सुमारे ३०८ किमी अंतराचे १२९ छोटे व मोठे नाले आहेत. ठाण्यातील नालेसफाई व्यवस्थितरित्या व्हावी, यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये नाल्यांच्या सफाई संदर्भात काही अटी व शर्ती लागू केल्या होत्या. पण ठेकेदारांनी संगनमत करून या अटी व शर्ती हटवण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडले. असे करून सुद्धा ठाण्यातील नाल्यांची सफाईची परिस्थिती बघितल्यास बहुतेक नाल्यांमध्ये कचरा तसाच असून ठेकेदार फक्त हाथ सफाई करत असल्याचा  स्वप्निल महिंद्रकर यांनी आरोप केला आहे.दर वर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्यात येते तसेच वर्षभर है नाले साफ ठेवण्याचे काम घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, पावसाळ्यापूर्वी घन कचरा विभागामार्फत नाल्यांची काटेकोर सफाई केली जात नसल्यामुळे  पावसाळ्यात पाणी साठून ते घरांमध्ये शिरते. याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असून नाले सफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्या येतात. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असूनही ते होत नसल्याचे वास्तव आहे. ठाण्यातील नाले साफसफाई म्हणजे केवळ हात सफाई असल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील दरवर्षी कुठलीही कारवाई ठेकेदारांवर केली जात नसल्यामुळे ठेकेदार सुद्धा बिंदिक्तपणे सफाई कामात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे.ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या होण्याच्या अनुषंगाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम करण्यात येऊन सुद्धा ठाण्यातील नाल्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. दरवर्षी करोडो रुपये नालेसफाईच्या नावावर मंजूर केले जातात. मात्र अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून काम न करताच पैशांची बिलं काढण्यात आपली धन्यता मानता.( स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे)

आम्ही या विभागात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहत असून येथे नालेसफाई न झाल्यामुळे लोकांच्या घरी पाणी घुसते व त्यामुळे येथे डेंगू मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात व त्याचा नाहक त्रास आम्हाला भोगाव लागतो. मनीष सावंत, स्थानिक नागरिक. गांधीनगर

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका