लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:30 PM2021-02-25T23:30:30+5:302021-02-25T23:30:30+5:30

ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. ...

Even if the name of the lockdown is removed, the thorn comes on the body | लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत

लॉकडाऊनचे नाव काढले तरी अंगावर येतो काटा; ठाण्यातील नागरिकांनी मांडले मत

Next

ठाणे : लॉकडाऊन नको रे बाबा! त्याचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो, अशा प्रतिक्रिया ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी अनेक उपाययोजना सरकारला करता येऊ शकतात. लॉकडाऊन आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, अशी नाना तऱ्हेची मते ठाणेकरांकडून व्यक्त होत आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला. त्याबद्दल सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाची साथ सुरू झाली तेंव्हा आधी केंद्राने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्याचे बरे-वाईट परिणाम सगळ्यांनी विशेषतः सर्वसामान्य लोकांनी भोगले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत आहे. (खरंच? सरकारी कामकाज संशयास्पद आहे!) म्हणून लॉकडाऊन करणे म्हणजे शासन आणि प्रशासनाने जबाबदारी टाळणे होईल. लोक ऐकत नाहीत ही सबब शासनाने सांगू नये, उपाययोजना करावी. गर्दी टाळण्यासाठी करण्यासारखे खूप काही आहे. सत्ता आणि यंत्रणा ताब्यात असलेले शासन ते करू शकते. पण, इच्छाशक्तीचा अभावच दिसतोय. 
- मकरंद जोशी, पर्यटन व्यवसायिक...

पुन्हा लॉकडाऊन नकोच. कारण आता अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. जनसामान्य माणूस आधीच अनेक जबाबदाऱ्यांखाली आणि महागाई, कर इत्यादीने वाकला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना लॉकडाऊन परवण्यासारखे नाही. एवढेच नाहीतर, लोक याच्या विरोधात आहेत आणि जर जबरदस्ती झाली तर लोक आंदोलन करतील. त्यापेक्षा सरकारने त्यावर ठोस निर्णय घ्यायला हवे.    - सुमुख राजे,     व्यवस्थापक, खाजगी कंपनी

आर्थिकदृष्ट्या लॉकडाऊन परवडणारा नाही, कारण ठाण्यात हातावर पोट असणारे शेकडो लोक आहेत. त्याला पर्याय म्हणून काही निर्बंध घालता आले तर योग्य होईल. आता कुठे व्यवसाय, उद्योग नीट सुरळीत होऊ लागले असताना, हा पर्याय पुन्हा अनेक अडचणी वाढवणारा ठरू शकतो.
    - डॉ. क्षितिज कुलकर्णी, ज्येष्ठ     लेखक, नाट्य दिग्दर्शक

Web Title: Even if the name of the lockdown is removed, the thorn comes on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.