शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

'फक्त फोन केलात तरी मी शंभरवेळा चौकशीला येईन'; सरनाईकांची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 20:13 IST

मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.  

मीरारोड - ईडीची काडी कोणी व कशासाठी केली, हे जनतेला कळून चुकलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात परखड भूमिका मांडली आहे.  मी असल्या चौकशांनी घाबरून महाराष्ट्र हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढणारा आहे आणि लढत राहणार. मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता फोन केलात तरी शंभर वेळा हजर होईन. पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता असे, आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.  ईडीची धाड आणि चौकशीनंतर पहिल्यांदाच सरनाईक हे मीरा भाईंदर महापालिकेत आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

अभिनेत्री कंगना रणौतने पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड मिळाल्याचे केलेल्या ट्विट बद्दल बोलताना ते म्हणाले की, कंगनाने कुठून स्वप्न दिसले माहित नाही . अश्या देशाचे तरी नाव घ्यायचे होते कि ज्या देशाचे जगात क्रेडिट असेल. ज्या देशाचे क्रेडिटच नाही त्याचे क्रेडिट कार्ड ठेऊन काय करणार असा टोला त्यांनी लगावला . कंगना आणि तिच्या ट्विटच्या आधारे खोट्या बदनामीकारक बातम्या देणाऱ्यांवर हक्कभंगा सह कायदेशीर कार्यवाही सुद्धा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला . 

टॉप्स प्रकरणी दाखल दोन्ही गुन्ह्यात आपले कुठेही नाव नसताना व कोणता पुरावा नसताना केवळ तोंडी कोणीतरी बोलले ह्या आधारावर चौकशी केली जात असल्या बद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले . ईडीला त्यांच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहोत आणि भविष्यात पण करणार . कंगना आणि अर्णब वर हक्कभंग टाकल्या नंतर माझ्या मागे ईडीची चौकशी लावली गेली आहे. पण आपण घाबरणार नाही.

शुरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दलदेखील जाणीवपूर्वक अपूर्ण प्रतिक्रिया दाखवत दिशाभूल करून वाद निर्माण करण्याचे कारस्थान आहे. तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी आणि  महाराजांसाठी जीवाची बाजी लावून लढणारे शूर योध्दा होते. त्यामुळे तानाजी मालुसरे माझ्यासाठी प्रेरणास्तोत्र आहेत. त्यांच्या मार्गावरच चालण्याचा प्रयत्न असतो असे ते म्हणाले.  

आपण ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की, मुलांना कसले बोलावता. त्यांचा काय संबंध.  मुलं अजून लहान असून आत्ता कुठे त्यांचे करियर सुरु झाले आहे. उलट मला नोटीस पण नका पाठवू , नुसता फोन केला तरी मी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होईन असे अधिकाऱ्यांना सांगितल्याचे सरनाईक म्हणाले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेनाthaneठाणे