दाउदला पाठवले तरी घोटाळे उघडणारच : सोमय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST2021-09-09T04:48:34+5:302021-09-09T04:48:34+5:30
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा स्वीय सहायक रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. मात्र ...

दाउदला पाठवले तरी घोटाळे उघडणारच : सोमय्या
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा स्वीय सहायक रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. मात्र अगदी दाउद आला तरी, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी ठाण्यात केले.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विहंग गार्डन यांनी ठिकाणी केलेल्या अनधिकृत बांधकामावरील २१ कोटींचा दंड वसूल करण्याच्या मागणीसाठी सोमय्या यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे १२ मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे भावना गवळी यांना वाचवण्यासाठी शरद पवार हे का प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.