शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

72 तासानंतरही दिव्यातील अनेक भागात पाणीच पाणी, अनेकांचे संसार आले उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:38 IST

सलग तीन दिवस कोसळणा-या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. आज तिस-या दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते.

ठाणे  - सलग तीन दिवस कोसळणा-या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. आज तिस-या दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल 72 तासानंतरही या घरातील शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या माध्यमातून रविवारी या भागातील सुमारे 8500 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र उघडय़ावर पडलेला संसार परत कोण जोडणार असा सवाल आता येथील नागरीक करु लागले आहेत. शिवाय या भागात आरोग्य केंद्रच नसल्याने पुराचे पाणी ओसरले तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे. त्याचा सामना कसा करायचा हे सुध्दा कोडेच येथील रहिवाशांना पडले आहे.शुक्रवारी रात्री पासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका ठाणो महापालिका हद्दीतील दिवा या भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागात शनिवार पासून पाणी शिरण्यास सुरवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवी नगर, बी.आर. नगर, सिध्दीविनायक नगर, बेडेकर नगर, मुंब्रा देवी कॉलनी आदींसह इतर भागातील तब्बल शेकडो घरे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. रविवारी तर बारबी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने आणि खाडीला भरती आल्याने दिव्यातील अनेक घरात पहिल्या मजल्यार्पयत पाणी होते. त्यानंतर पालिका, टीडीआरएफ, एनडीआरएफच्या मदतीने येथील सुमारे 8500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.दरम्यान सोमवारी पावसाने उसंत घेतली असली तरी या भागात पाणीच पाणी अशी परिस्थिती होती. अनेक शाळकरी मुलांच्या वह्या, पुस्तके, अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकविण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरु होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून डोळ्यातून अश्रु वाहत होता. तर कोणी अख्खा संसारच वाहुन गेल्याने दुखा:त होता. परंतु त्यांचे अश्रु पुसण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हता. दरम्यान दुसरीकडे स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाष्टा, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. तर सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. आता मात्र सांयकाळपासून पाणी ओसरु लागले असल्याने दिव्यात आता आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून या भागात फवारणी, गोळ्या, औषधांचे वाटप, मेडीकल कॅम्प घेण्यास सुरवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु येथील रहिवाशांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आता जोर धरु लागली आहे. 

दिव्यात आरोग्य केंद्रच नाहीपाच लाखाहून अधिकची लोकसंख्या असलेल्या दिवा भागात आरोग्य केंद्रच नसल्याची बाब या निमित्ताने प्रकर्शाने समोर आली आहे. या भागात आरोग्य केंद्र सुरु व्हावे अशी मागणी येथील नागरीकांनी अनेक वेळा पालिकेकडे केली आहे. मात्र अद्यापही या भागात आरोग्य केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे आता येत्या 15 ऑगस्ट रोजी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. वीजही गायबदिव्याच्या विविध भागात 72 तासानंतरही पाणी ओसरले नसल्याने या भागातील अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. तर दुसरीकडे शनिवार पासून या भागातील वीज पुरवठाही गायब झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर