शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा गंडा घालून इस्टेट एजंट पसार; शोधण्यात पोलिसांचे अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 15:13 IST

मीरारोडच्या झंकार कंपनी जवळील विनय नगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्पलेक्समध्ये हार्दिक उर्फ राज मुक्तीलाल शेठ हा पत्नी व मुली सोबत भाड्याने रहायला आला.

मीरारोड - ३८ लोकांकडून भाड्याने घर मिळवून देण्यासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन ती परस्पर लाटणारा मीरारोड मधील इस्टेट एजंट कुटुंबासह पसार झाला आहे. १ कोटी ८१ लाखांना गंडा घालणारा हा एजंट गुन्हा दाखल होऊन महिना व्हायला आला तरी तो काशिमीरा पोलीसांना तो हाती लागलेला नाही. काहींनी रोखीने सुध्दा पैसे दिले असुन पैसे दिल्याचा पुरावा नसल्याने ते तक्रारीसाठी पुढे आले नाहीत. त्यांची रक्कम धरल्यास ५ कोटींच्या घरात फसवणूक झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पळून जाण्याआधी त्याने आत्महत्या करत असून पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी कुटुंबियांचे रक्षण करावे, असे चिठ्ठीत लिहले आहे.

मीरारोडच्या झंकार कंपनी जवळील विनय नगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्पलेक्समध्ये हार्दिक उर्फ राज मुक्तीलाल शेठ हा पत्नी व मुली सोबत भाड्याने रहायला आला. येथे त्याने स्वत:ची सर्व कागदपत्रे तयार करुन राज इस्टेट नावाने इस्टेट एजन्सीचा धंदा सुरु केला. मोठी अनामत रक्कम घेऊन बिनभाड्याची सदनिका या परिसरात तो लोकांना घेऊन देत असे. स्वत:ला धार्मिक दाखवत असल्याने लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

मोठी अनामत रक्कम घेऊन तो भाडेरुला मात्र घरमालकास तसं सांगू नका असं बोलायचा. आणि घरमालकासोबत भाडेकरुचा भाडेकरार करायचा व स्वत: सोबत तो भाडेकरुचा मोठ्या अनामत रकमेचा वेगळा करारनामा करायचा. अशा प्रकारे त्याने अनेकांकडून काही कोटी रुपये गोळा केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ४ लाखांपासून  ३० लाखांपर्यंतची रक्कम त्याने उकळली आहे. अनेकांनी तर रोखीने व्यव्हार केल्याने पोलिसांकडून पुरावा मागितला जात असल्याने रोखीने पैसे देऊन फसलेले कोणी पुढे येण्यास तयार नाहीत.

वास्तविक नोव्हेंबर अखेरीसच हार्दिक हा कुटुंबासह रातोरात पसार झाला. त्याचे कार्यालय सुध्दा बंद आढळल्याने अनामत रकमेसाठी मोठी रक्कम दिलेली लोकं गोळा झाली. सुमारे ४० जणांनी काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. पण पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल करुन न घेता केवळ अर्जच घेतला.

पळुन जाण्याआधी हार्दिकने दोन पानाची आत्महत्या करत असल्याची गुजराती भाषेत चिठ्ठी लिहली. सदर चिठ्ठीत त्याने वैभव शिंगारे यांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, तसेच आपल्या आत्महत्येस काही जणांची नांव लिहुन ते जबाबदार असल्याचे नमुद केले.

लोकांचा वाढता तगादा पाहता अखेर पियुष कांतीलाल दरजी यांनी दिलेल्या ५ डिसेंबर रोजीच्या तक्रार अर्जाच्या आधारे १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दरजीसह एकुण ३८ जणांनी घर भाड्याने देण्यासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन हार्दिकने आपली फसवणूक केल्याचे पोलिसांसमोर आले आहे. धनादेश आदी अधिकृत व्यवहाराने दिलेली फसवणुकीची रक्कम १ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. पण रोखीने घेतलेली रक्कम सुध्दा मोठी आहे.

सुरतला त्याचे आई-वडिल रहात असुन त्यांच्याकडे चौकशी केली असता आपला मुलगा फसवणुकीचे धंदे करत असल्याने आपण त्याच्या संबंध ठेवला नसल्याचे त्यांनी पोलीसांना सांगीतल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याची एक कार मॅकडोनाल्ड जवळ फसलेल्या लोकांनीच पोलीसांना पकडून दिली. तर दुसरी कार सुध्दा शहरात दिसून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

घरमालकांना भाडे मिळेना, घर खाली करण्याचा तगादाहार्दिकने मोठी अनामत रक्कम घेऊन अनेकांना लाखोंचा चुना लावला असतानाच आता घराचे भाडे मिळाले नाही म्हणुन घरमालकांनी सुध्दा भाड्यासाठी तगादा लावला आहे. अन्यथा घर रिकामे करा, असे सांगीतले जात आहे. त्यामुळे फसवणुक झालेले दुहेरी कात्रीत सापडले आहेत. आरोपी हार्दिक व त्याचे कुटुंब तसेच त्याने फसवणूक करुन गोळा केलेली काही कोटींची रक्कम पोलीसांना सापडत नसल्याबद्दल फसवणूक झालेले चिंतीत आहेत.

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिस