‘पर्यावरण उत्कर्ष’ची कार्यकारिणी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST2021-07-22T04:25:20+5:302021-07-22T04:25:20+5:30

वासिंद : पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, पर्यावरणविषयक जागृती व ढासळत्या ...

Establishment of Executive for ‘Environmental Prosperity’ | ‘पर्यावरण उत्कर्ष’ची कार्यकारिणी स्थापन

‘पर्यावरण उत्कर्ष’ची कार्यकारिणी स्थापन

वासिंद : पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन, पर्यावरणविषयक जागृती व ढासळत्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणे व उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष विजय चोघळा यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिव कुमूद शहाकार व राष्ट्रीय खजिनदार भालचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा कार्यकारिणीची निवडण्यात आली. ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदी शेखर लोणे, सरचिटणीसपदी प्रदीप चव्हाण, प्रसिद्धी प्रमुखपदी प्रशांत जाधव, तर कल्याण तालुकाध्यक्ष म्हणून रूपेश पितांबरे, सचिवपदी नितीन चौधरी, उपाध्यक्षपदी अनंता दळवी, नंदकुमार दिवाणे, भिवंडी तालुकाध्यक्षपदी सचिन पाटोळे व शहापूर तालुकाध्यक्षपदी सचिन ढमणे यांची नेमणूक केली आहे.

------------

Web Title: Establishment of Executive for ‘Environmental Prosperity’