शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:59 PM

नृत्य, गाणी, पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव संपन्न झाला.

ठळक मुद्देशाहिरी लोककला महोत्सव संपन्न किरण कुबल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटनविविध क्षेत्रातील मान्यवरांना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित

ठाणे : महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन सोहळा आणि शाहिरी लोककला महोत्सव २०१८ रविवारी ठाणे (पू). येथील संत तुकाराम मैदानात पार पडला. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्य, कोळीनृत्याद्वारे लोककलेचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.महोत्सवाचे उद्घाटन किरण कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. सुरूवातीला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुसुदन सुगदरे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष शाहीर रमेश नाखवा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी मुंबई विशेषांकचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रतिष्ठानचे सचिव विनोद नाखवा यांनी पुढील वर्षीचा हा कार्यक्रम परदेशात करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर उदय साटम लिखीत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमास सुरूवात झाली. देवा तुझ्या दारी आलो, मन गेलंय माहेरी, गाव जागवित आली या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. शाहीर शातांराम चव्हाण यांनी ‘या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे गीत सादर केले. त्यानंतर मराठी मुंबई गौरव पुरस्काराने दिलीप पाटील व उद्योजक गणेश सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. शाहीर मधु खामकर यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर शेतकरी नृत्य, ठाकरी नृत्य सादर झाले. दर्शन साटम याने सैराट चित्रपटातील याड लागलं हे गाणे सादर केले. लावणी सम्राज्ञी हिने ‘बाई मी लाडाची गं’ ही लावणी सादर केली, यावेळी शिट्टया आणि टाळ््यांची तसेच, वन्समोअरची रसिकांमधून दाद मिळाली. लोकशाहीर दादा कोंडके यांना या कार्यक्रमात स्वरांची सुमरांजली वाहण्यात आली. त्यांची हिल पोरी हिला, मी तर भोळी अडाणी ठकू, ढगाला लागली कळ ही गाणी नृत्याद्वारे सादर झाली. शाहिर रमेश नाखवा यांनी बोला मल्हारीचा येळकोट हे गीत सादर केले. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित झाल्या. विनोद नाखवा यांनी पुढील कार्यक्रम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी शिंदे म्हणाल्या की, लोककलेची गाणी स्फुर्ती देणारी आहे. महापालिकेच्या माध्यमातून असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहेत. माझ्या कार्यकाळात असे कार्यक्रम होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शाहिर दत्ता ठुले यांनी आंबेचा गोंधळ सादर केला. निलेश जाधव यांनी संभाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.दरम्यान, नृत्यकलाकार सुरेखा काटकर, दुरदर्शनचे विनायक चासकर, प्रकाश भडगुजर, सर्जन डॉ. मिलिंद पाटील, डॉ. मंजिरी देव, जयवंत वाडकर, आशिष पवार, प्रभाकर मोरे, उदय साटम आदींना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन महेंद्र कोंडे यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई