शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 02:56 IST

भिवंडीतील कोरोना परिस्थितीचा आढावा

भिवंडी : कोरोनाच्या चाचणीसाठी नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालय व जिल्ह्यातील एमएमआर क्षेत्रात पाच ठिकाणी मुंबईप्रमाणे सुसज्ज लॅब सुरु केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता अहवालासाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागणार नाही. या लॅबमध्ये मोफत तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात १५ दिवसात ही प्रयोगशाळा सुरु होणार आहे. अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शहापूर येथे प्रयोगशाळा सुरु केल्या जातील असे त्यांनी सांगितले. शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टोपे यांनी गुरुवारी भिवंडी महापालिकेस भेट देऊन कोरोना संदर्भातील आढावा घेतला. यावेळी शहरातील कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी लागणारा निधीही मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती दिली. शहरातील एकमेव कोविड रुग्णालयाचा वाढता ताण लक्षात घेता या रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची लवकरच भरती केली जाणार आहे. इंदिरा गांधी कोविड रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असून २८ रुग्णवाहिकाही शहरासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्ह्यात होणार मल्टिस्पेशालिटी रुग्णालयभिवंडीकरांनी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास घरात न थांबता त्वरित उपचारासाठी रुग्णालयात जावे, जेणेकरून नागरिकांवर वेळेत उपचार करून कोरोनावर मात करता येईल असे आवाहनही रोजेश टोपे यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यात एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयही लवकरच उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्ह्यातील बेडसाठी डॅशबोर्ड : एमएमआर रिजनमध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची रोजची अपडेट जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करून त्यावर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश टोपे यांनी दिले. कोरोनाचे रुग्ण सापडल्यावर त्यासलंग्न असलेल्या रुग्णांची ट्रेसिंग करण्याच्या सुचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत. अलगीकरण कक्ष वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या परिसरातील महाविद्यालय, हॉटेल आदी सर्व आस्थापनांशी चर्चा करून त्या जागा ताब्यात घेण्यावर भर देण्यासही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे