शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

शालेय विद्यार्थी देणार पर्यावरण रक्षणाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 12:13 AM

विविध ठिकाणी देणार भेट : सर्वांगीण विकासासाठी शाळेचा उपक्रम, सायकलवरून झाले रवाना

बदलापूर : ‘प्लास्टिक टाळू या, पर्यावरण सांभाळू या’चा नारा देत बदलापूरच्या योगी अरविंद गुरुकुल शाळेचे विद्यार्थी मातृभूमी परिचय शिबिरासाठी सायकलवरून रायगड जिल्ह्यात रवाना झाले आहेत. शाळेचे तिसरीपासून नववीपर्यंतचे विद्यार्थी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, शिक्षकवर्ग आणि पालकांच्या उपस्थितीत शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. योगी श्री अरविंद गुरु कुल ही शाळा विद्यार्थी यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक उपक्र म राबवित असते. शाळेच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत मातृभूमी परिचय शिबिर होते. विद्यार्थी यांच्यात सहकार्य, समयसूचकता, साहस, ध्यैर्य, राष्ट्रभक्ती, स्वक्षमतांची जाणीव ओळख, श्रमाचे महत्त्व, निसर्गाच्या प्रती प्रेम आणि जागृती याद्वारे स्वत:त कला जाणीव निर्माण करणे, माणुसकी हा गुण मिळवून तो जपणे अशा गुणांनी विकसित करण्यासाठी ‘मातृभूमी परिचय शिबीर’ हा उपक्र म राबविला जातो. या उपक्र मात वरील सर्व गुण विकास व्हावा या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याला संधी उपलब्ध करून देण्यात येते. सोमवारी सकाळी पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी मामणोली येथे तर तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी वसई- विरार येथे, पाचवीचे विद्यार्थी वज्रेश्वरी येथे, सहावी आणि सातवीचे विद्यार्थी संगमनेरला जाणार आहेत. या विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आठवीचे विद्यार्थी रवाना झाले आहेत. विद्यार्थी व्यवस्थापनासोबत लहानांचे संगोपन, ममत्त्व, काळजी घेणे या गुणांनी विद्यार्थी परिपूर्ण होतात असा विश्वास शाळेने व्यक्त केला.१० फेब्रुवारीला बदलापूरला येणारनववीचे विद्यार्थी रायगड परिसरात ७०० ते ७५० किलोमीटर इतके अंतर सायकलने प्रवास करणार आहेत. या कालावधीत सायकल शिबिराद्वारे साहस, निर्णय क्षमता, शारीरिक क्षमता, मानिसक क्षमता, स्वावलंबन, श्रमाचे महत्त्व निसर्गप्रेम, निसर्ग संतुलन जाणीव, वाहतूक नियम, संघ जाणीव अशा सर्व गुणांनी विकसित करण्यासाठी ही साहसी संधी दिली जाते. या शिबिराद्वारे उद्याचे सर्वार्थाने सक्षम नागरिक तयार होतात. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील विविध स्थळांना विद्यार्थी भेटी देणार असून तेथील परिस्थिती जाणून घेणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी विद्यार्थी बदलापूरला परत येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूर