शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जागतिक पर्यावरण दिवशीच मीरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणाचा ऱ्हास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 13:57 IST

मीरा भाईंदर महापालिका आणि येथील बहुतांश लोकप्रतिनिधी, राजकारणी यांना पर्यावरणाचे नेहमीच वावडे राहिले आहे.

मीरारोड - शुक्रवारच्या जागतिक पर्यावरण दिवशी छाटणीच्या नावाखाली हिरवीगार लहानमोठी झाडे पार छाटून टाकण्याचा प्रकार मीरा भाईंदर महापालिकेने केला आहे. झाडांची छाटणी की वृक्ष तोड असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मीरा भाईंदर महापालिका आणि येथील बहुतांश लोकप्रतिनिधी, राजकारणी यांना पर्यावरणाचे नेहमीच वावडे राहिले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्तांपासून तत्कालीन आमदार, अधिकारी, ठेकेदार तसेच खाजगी लोकांवर पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हे दाखल आहेत. 

शहरातील झाडांची अवास्तव कत्तल, मनमानी छाटणी तसेच झाडांच्या देखभाल कडे होणारी डोळेझाक देखील नेहमीच वादाचा मुद्दा ठरले आहेत. अनेक नगरसेवक तर झाडांच्या छाटणीचे मोठ्या कौतुकास्पद काम केल्या सारखेसेल्फी वा फोटो शेयर करत असतात. 

शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिवस असून देखील महापालिकेने शहरात छाटणी चालवली होती. भाईंदरच्या बालाजी नगर मध्ये तर स्थायी समिती सभापती अशोक तिवारी यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छाटणी वेळचे फोटो पोज देऊन काढले. परंतु येथे छाटणी ऐवजी हिरवीगार लहान मोठी झाडेच मोठ्या प्रमाणात छाटून टाकण्यात आली. झाडांवरच्या पक्ष्यांच्या घरट्यांचा पण विचार केला गेला नाही. काही झाडांवर तर फांद्याच ठेवण्यात आल्या नाहीत इतकी छाटणी करून टाकण्यात आल्याने  अनेक राहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. 

वास्तविक छाटणीसाठी काय निकष पाळायचे याचे हरित लवादाने आदेश दिले आहेत. परंतु त्याला सुद्धा पालिका आणि लोकप्रतिनिधींकडून हरताळ फासला जात आहे. जागतिक पर्यावरण दिवशीच झाडांची केलेली अशी तोड पाहून महापौर ज्योत्स्ना हसनाळे देखील संतापल्या. त्यांनी उद्यान विभागाचे अधिकारी नागेश वीरकर व हंसराज मेश्राम यांना अश्या प्रकारे छाटणी करू नका असे आदेश दिले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर