शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीत पक्ष्यांची घरटी होताहेत नष्ट, पक्षितज्ज्ञांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:08 IST

रस्त्यांच्या कामात झालेल्या वृक्षतोडीत पक्ष्यांची घरटी नष्ट होत असल्याने पक्षिप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत.

- वसंत पानसरेकिन्हवली  - शहापूर तालुक्यात सध्या अ‍ॅन्युइटी हायब्रीड प्रकल्पांतर्गत रस्ता रुंदीकरण आणि नवीन रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्यांच्या कामात झालेल्या वृक्षतोडीत पक्ष्यांची घरटी नष्ट होत असल्याने पक्षिप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे याबाबत वन्यजीव विभाग किंवा पक्षितज्ज्ञांच्या माध्यमातून गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यात सध्या शहापूर ते लेनाडमार्गे मुरबाड पुढे खोपोली, तर शहापूर ते डोळखांब व पुढे किन्हवली प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, लहानमोठे व पूल आणि नवीन रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या कामात हजारोंच्या संख्येने विविध झाडे तोडण्यात आली. या झाडांची बेसुमार तोड होत असतानाच पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या पक्ष्यांनी बांधलेली घरटी उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी, घरट्यातील निष्पाप पिलांना घरट्यातून बेदखल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पक्षिप्रेमी सोशल मीडियावर करत आहेत.त्यातच, पावसाळा सुरू झाल्याने पिलांसाठी घरटे बनवणे अशक्य आहे. परंतु, हे असेच सुरू राहिल्यास पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याच्या मार्गावर येईल. या रस्त्यांच्या विकासात पक्ष्यांच्या नवजात पिलांचा किंवा पक्ष्यांची अंडी यांचा बळी जात असल्याचा आरोप केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षतोडीमुळे एका कावळ्याच्या पाडलेल्या घरट्याच्या प्रकारामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वन्यजीव विभाग आणि पक्षितज्ज्ञांनी लक्ष घालावे, अशी मागणी पक्षी आणि निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.वृक्षतोड झाल्याने फांद्यांवरील घरट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पक्ष्यांना राहण्यासाठी कृत्रिम घरट्यांची सोय करणे गरजेचे आहे. - सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था.

टॅग्स :environmentवातावरणthaneठाणे