शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा पोलिसांकडून एटीएसने घेतल्या स्टेशन डायरीतील नोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 02:39 IST

दोन खासगी बँकांमध्येही चौकशी

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा पोलिसांकडून मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला, त्या ५ मार्च रोजीच्या स्टेशन डायरीतील नोंदी ताब्यात घेतल्या. अन्य एका पथकाने एटीएसच्या ठाणे कार्यालयात मनसुख यांची पत्नी विमला आणि मोठा मुलगा मित यांची बुधवारी सुमारे पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले असताना एटीएसच्या वेगवेगळ्या पथकांनी तपास गतीने सुरू केला. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या अधिपत्याखाली एका पथकाने मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली. यामध्ये हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या ५ मार्चच्या स्टेशन डायरीतील नोंदी तपासल्या. घटनास्थळाचा पंचनामा, पंच यांची माहितीही घेतली. त्यादिवशी एक मृतदेह खाडीकिनारी दिसत असल्याचे रेल्वे ब्रिज येथे काम करणाऱ्या वाघमारे नामक व्यक्तीने सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे माहिती दिली होती. तीच माहिती मुंबई नियंत्रण कक्षातून ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ठाणे नियंत्रण कक्षातून मुंब्रा पोलिसांकडे माहिती आल्यानंतर त्याठिकाणी मुंब्रा पोलीस आणि ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पोहचले होते.क्रेनच्या मदतीने मृतदेह शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास खाडीजवळील चिखलातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यात दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान हिरेन यांचा मुलगा मित याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. एक अनोळखी मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात आढळला असून तो ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठेवल्याची माहिती हिरेन कुटुंबीयांना मिळाली. तेव्हा मनसुख हिरेन यांच्या भावाने रुग्णालयात जाऊन दुपारी ४.३० वाजता खात्री केल्यानंतर मृतदेह मनसुख यांचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तो अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे शुक्रवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाचे मत डॉक्टरांनी राखीव ठेवले आहे, असा सर्व घटनाक्रम मुंब्रा पोलिसांकडून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन खासगी बँकांमध्येही चौकशीnहिरेन कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसुख यांनी कोणाशी बँक व्यवहार केले आहेत का? सचिन वाझे यांच्याशी त्यांचे कोणत्या प्रकारे आर्थिक संबंध आले का? अशा सर्वच बाजूंनी एटीएसच्या अन्य एका पथकाने तपासणी केली. त्यासाठी ठाण्यातील दोन खासगी बँकांमध्येही या पथकाने चौकशी केली. nबुधवारी दुपारी १.३० ते सायंकाळी ६.३० अशी तब्बल पाच तास विमला हिरेन आणि मुलगा मित यांची ठाण्याच्या एटीएस कार्यालयात चौकशी झाली. या चौकशीतील तपशील मात्र समजू शकला नाही.

टॅग्स :thaneठाणेMansukh Hirenमनसुख हिरणPoliceपोलिस