जिल्हाभर शिवजयंती उत्साहात
By Admin | Updated: February 20, 2016 01:59 IST2016-02-20T01:59:28+5:302016-02-20T01:59:28+5:30
शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी पालिका मुख्यालयात, कळवा ब्रिज येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहा

जिल्हाभर शिवजयंती उत्साहात
ठाणे : शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी पालिका मुख्यालयात, कळवा ब्रिज येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच शहरात विविध ठिकाणी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर संजय मोरे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपमहापौर राजेंद्र साप्ते, विरोधी पक्षनेते संजय भोईर, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समितीचे सभापती संभाजी पंडित, शिक्षण समिती सभापती नरेश मणेरा, नौपाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष हिराकांत फर्डे, नगरसेवक गिरीश राजे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपआयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक भास्कर पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्यालयीन उपअधीक्षक दत्ता गोंधळे, सहायक सुरक्षा अधिकारी शुक्र ाम जाधव आदी उपस्थित होते. कळवा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ठाणे महानगरपालिकेचे उपआयुक्त माळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. तसेच शहरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले होते. तर, काही ठिकाणी रॅली काढण्यात आली होती.भार्इंदर : यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी झाली. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला व शहराच्या काशिमीरा येथील प्रवेशद्वारावरील पूर्णाकृती पुतळ्याला महापौर गीता जैन यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी पालिका आयुक्त अच्युत हांगे, उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ, डॉ. संभाजी पानपट्टे, दीपक कुरुळेकर, उपस्थित होते. खर्डी : शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खर्डीतील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्र मांचे आयोजन केले होते. महाराजांना मानवंदना देण्यासाठी दळखण गावापासून खर्डी दगडी मराठी शाळेपर्यंत ढोलताशांच्या गजरात शिस्तबद्ध मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यानंतर, डोंबिवली येथील १४ वर्षांच्या प्राची वारे हिचा शिवव्याख्यानाचा कार्यक्रम झाला.शिरोशी : टोकावडे येथे सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शिवजयंती साजरी झाली. शिवनेरी येथून रात्री ११ वाजता मशाल पेटवून माळशेज घाटमार्गे टोकावडे येथे मशाल आणण्यात आली. तसेच गाणी, भाषणे, पोवाडे अशा कार्यक्रमानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली.