बारवरील कारवाईची झळ करमणूक विभागाला
By Admin | Updated: December 23, 2016 03:11 IST2016-12-23T03:11:17+5:302016-12-23T03:11:17+5:30
अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेने केलेल्या तोड कारवाईने बारवाल्यांचे एकीकडे धाबे दणाणले असताना दुसरीकडे त्याची

बारवरील कारवाईची झळ करमणूक विभागाला
ठाणे : अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेने केलेल्या तोड कारवाईने बारवाल्यांचे एकीकडे धाबे दणाणले असताना दुसरीकडे त्याची झळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक विभागाला बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ‘त्या’ १८ लाइव्ह आॅर्केस्ट्रा बारकडून मनोरंजन करापोटी मिळणाऱ्या दरमहा ९ लाखांवर पाणी सोडावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला होता. यामध्ये अनधिकृत बारही जमीनदोस्त करण्यात आले. त्यातच, उपवन येथील सत्यम बारमध्ये सापडलेल्या २९० खोल्यांनी महापालिका आणि पोलीस दल आमनेसामने आले होते. याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बारमालकासह चालक आणि दलाल अशा पाच जणांविरोधात करवाई केली. याचदरम्यान, महापालिकेने कोपरी, मुंब्य्रातही कारवाई करताना तेथीलही अनधिकृ त बांधकामांसह बारवर हातोडा टाकला. त्यामुळे अनेक बारवाले धास्तावले. मात्र, महापालिकेच्या या कारवाईचे बार परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.
परंतु, ठाणे जिल्हाधिकारी करमणूक विभागामार्फत ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या लाइव्ह आॅर्केस्ट्रा बारकडून मनोरंजन करमणूक कर आकारण्यात येतो. (प्रतिनिधी)