अखेरच्या श्वासापर्यंत रसिकांचे मनोरंजन करणार
By Admin | Updated: February 23, 2017 05:44 IST2017-02-23T05:44:52+5:302017-02-23T05:44:52+5:30
संपूर्ण महाराष्ट्र माझे मायबाप आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून रसिकांनी भरभरून

अखेरच्या श्वासापर्यंत रसिकांचे मनोरंजन करणार
बदलापूर : संपूर्ण महाराष्ट्र माझे मायबाप आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. म्हणूनच, अखेरच्या श्वासापर्यंत श्रोत्यांचे मनापासून मनोरंजन करत राहणार, असे उद््गार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी काढले. पाच दिवस सुरू असलेल्या ‘बदलापूर महोत्सवा’ची सांगता ‘एव्हरग्रीन सचिन’ या सचिन यांच्याच कार्यक्रमाने झाली.
शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने नगराध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने उल्हास नदीच्या चौपाटीवर ‘बदलापूर महोत्सव’ सुरू होता. सचिन यांच्या ‘एव्हरग्रीन सचिन शो’ने सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. ज्येष्ठ संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या आठवणी सांगून त्यांचे ‘बडे अच्छे लगते है’ हे गीत सचिन यांनी सादर केले. तसेच मन्नाडे यांची ‘लागा चुनरी मी दाग’ ही गाणी सादर केली. ज्येष्ठ पार्श्वगायक किशोरकुमार यांची आठवण सांगताना सचिन म्हणाले, माझ्या पहिल्याच भेटीत किशोरदा आणि पंचमदा म्हणाले होते, तुला जर गायक व्हायचे असेल, तर गाताना कोणतीही कसर आवाजात ठेवू नकोस. मनापासून गा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा सल्ला आजही मला उपयोगी पडत आहे. आज मी गायक नसलो, तरीही त्यांची गाणी सादर करू शकतो, असे ते म्हणाले. पंचमदा व किशोरदा यांच्यासारखे गुरू मला लहान वयात भेटले, हे मी माझे भाग्य समजतो, असे सचिन यांनी सांगितले. या दोघांची गाणी पिढ्यान्पिढ्या अजरामर राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
इजिप्तच्या कलाकाराने जिंकली मने
च्बदलापूर महोत्सव सोमवारी गाजविला तो परदेशी कलाकारांनी. अमेरिकन नृत्यकलाकारांसोबतच इजिप्तच्या कलाकारांनी बदलापूरकरांची मने जिंकली. हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी बदलापूरकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर देशी गाण्यावर परदेशी नृत्य असा अनोखा मिलाप बदलापूरकरांना अनुभवता आला.
च्१७ फेब्रुवारीपासून बदलापूरच्या उल्हासनदीवरील चौपाटीवर ‘बदलापूर महोत्सव’ सुरू आहे. वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून चार वर्षापासून हा महोत्सव भरविला जात आहे. नृत्याची जुगलबंदी पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व प्रांताचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले. या नृत्यासोबत परदेशातून आलेल्या तीन कलाकारांनी बदलापूरकरांना थिरकायला लावले.