केडीएमसी हद्दीत कोरोना बेडची माहिती डॅशबोर्डवर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:27+5:302021-04-03T04:36:27+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका सुरुवातीला कोरोनाबाधितांची नावासह यादी जाहीर करीत होती. त्यानंतर ती देणे बंद केले. केवळ आकडेवारीच ...

केडीएमसी हद्दीत कोरोना बेडची माहिती डॅशबोर्डवर द्या
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका सुरुवातीला कोरोनाबाधितांची नावासह यादी जाहीर करीत होती. त्यानंतर ती देणे बंद केले. केवळ आकडेवारीच दिली जात आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयात बेडची कमतरता आहे. यामुळे कोणत्या रुग्णालयात किती बेड आहेत. किती रिक्त आणि किती भरलेले आहेत, याची माहिती डॅशबोर्डवर दिली पाहिजे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी केली.
महापालिकेच्या हद्दीत कोरोनाची खासगी ३० रुग्णालये आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर तेथील उपलब्ध बेडचा डॅशबोर्डचा तक्ता पाहिल्यास अनेक रुग्णालये त्यांची माहितीच अपडेट करीत नसल्याने किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती मिळणे नागरिकांना कठीण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने रोजच्या रोज बाधितांची यादी जाहीर करावी. तशा प्रकारचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावेत. बाधितांची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करून घेण्यास पुढे येतील. तसेच अन्य लोकही सावध होतील, असे ते म्हणाले.
राज्य सरकार कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबद्दल एकदम शून्य आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली.
------------------------