शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

By सुरेश लोखंडे | Updated: April 16, 2023 16:22 IST

शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी.

ठाणे : शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचान्यांना सातवा वेतन त्वरीत लागू करावा. पाचव्या आणि सहावा वेतन आयोगाचा फरक त्वरीत देण्यात यावा, वेळो वेळी लागू होणारा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबईच्या ऐरोली येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी रविवारी एकत्र येत ठाणे जिल्हाधािकरी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी  संविधानिक पद्धतीने प्रलंबित मागण्यांसाठी येथील शासकीय विश्रामगृहाबाहरे एकत्र येऊन आंदोलन छेडले. रविवारच्या या एक दिवसीय धरणे आंदोलनाव्दारे दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून दरमहा १ ते ७ तारखेच्या आत वेतन मिळावे आदी प्रमुख मागण्या लावून धरत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाचव्या, सहाव्या वेतन आयोगाचा फरक त्वरीत देण्यात यावा. शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचान्यांना सातवा वेतन लागू असताना सुध्दा या महाविद्यालयाकडून ९० ते ९५ टक्के महागाई भत्ता सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे देत असल्याची मनमानी कर्मचाºयांनी यावेळी उघड केली.

शिक्षकेत्तर कर्मचाºयाच्या नेमणुकी आधी महाविद्यालयाने शासन नियमानुसार रिक्त जागा जाहिरात देऊन भरण्यात यावी. महाविद्यालयाने तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियमांचे पालन करावे. शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाºयांना २० लाख रूपये ग्रॅच्युटी मिळायला पाहीजे. दरवर्षी वार्षिक वेतनवाढ देणे. गेल्या दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ त्वरीत द्यावी. सीएएस अंतर्गत पदोन्नती देण्यात यावी. शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी.उन्हाळी व हिवाळी दीर्घ मुदतीच्या रजा मिळाव्यात. कोरोना काळात कर्मचान्यांचे रोखलेले वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या कर्मचाºयांनी तीव्र आंदोलन करून महाविद्यालयाची मनमानीही उघड केली.

टॅग्स :thaneठाणे